सफाई कामगारांच्या वारसांची उपासमार

By admin | Published: June 27, 2017 12:16 AM2017-06-27T00:16:53+5:302017-06-27T00:26:12+5:30

नाशिक : वाल्मीकी, मेघवाळ, मेहतर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लाड, पागे, मलकाना कमिटीच्या नियमानुसार सेवानिवृत्त व मयत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कामावर घेण्यात यावे,

Hunger for the cleaning workers' heirs | सफाई कामगारांच्या वारसांची उपासमार

सफाई कामगारांच्या वारसांची उपासमार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वाल्मीकी, मेघवाळ, मेहतर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लाड, पागे, मलकाना कमिटीच्या नियमानुसार सेवानिवृत्त व मयत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कामावर घेण्यात यावे, अशी मागणी वाल्मीकी मेघवाळ, मेहतर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आली आहे. वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाल्मीकी, मेघवाळ, मेहतर समाजाच्या विकासासाठी लाड, पागे, मलकाना समितीच्या नियमानुसार सेवानिवृत्त व मयत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कामगार या पदावर नेमणुका देण्याचे आदेश दिलेले आहे.  परंतु जिल्हा रुग्णालयातील अस्थापना विभाग हेतुपुरस्कार भविष्यात या वर्गाला शासनाकडील लाड, पागे, कमिटीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे या समाजातील तरुणावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे मयतांच्या आणि सेवानिवृत्तांच्या वारसांना सफाई कामगार पदावर नेमणूक देण्यात यावी, तसेच सफाई कामाबाबत ठेकेदारी पद्धत बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर सुरेश दलोड, सुरेश मारू, ताराचंद पवार, रमेश मकवाना, हरिष पवार, रणजित कल्याणी, जयसिंग मकवाना, हरिष पवार, प्रमोद मारू, हर्षद पडाया आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Web Title: Hunger for the cleaning workers' heirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.