एचएएल कामगार संघटनेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:31 PM2018-08-17T23:31:40+5:302018-08-18T00:46:50+5:30
एचएएल कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सुविधांसह वेतन करार पाच वर्षांचा झालाच पाहिजे या मुद्द्यावर आॅल इंडिया एचएएल ट्रेड युनियन कॉर्डिनेशन कमिटीने दि. २४ आॅगस्ट रोजी देशातील संपूर्ण एचएएल कामगार डिव्हिजन एकदिवसीय संपाची नोटीस व्यवस्थापनाला देण्यात आली आहे.
ओझर : एचएएल कामगारांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सुविधांसह वेतन करार पाच वर्षांचा झालाच पाहिजे या मुद्द्यावर आॅल इंडिया एचएएल ट्रेड युनियन कॉर्डिनेशन कमिटीने दि. २४ आॅगस्ट रोजी देशातील संपूर्ण एचएएल कामगार डिव्हिजन एकदिवसीय संपाची नोटीस व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. येथील एचएएल कामगार संघटनेतर्फे शुक्रवारी मुख्य प्रवेशद्वारावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कंपनीकडून कामगारांना पुरवण्यात येणाºया अत्यावश्यक सुविधांमध्ये हॉस्पिटल सुविधा, अग्निशमन दल, एअर ट्राफिक कंट्रोल, सिक्युरिटी सुविधा सुरू राहणार असून, संपाच्या पार्श्वभूमीवर वेतन करार पाच वर्षांचा झालाच पाहिजे, ‘हमारी मांगे पुरी करो’ अशा घोषणा देत या मुद्द्यांकडे प्रशासनाचे वर लक्ष वेधले गेले. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष भानुदास शेळके, सचिन ढोमसे, जितू जाधव, पवन आहेर, योगेश ठुबे, प्रकाश गभाले, गिरीश वलवे, दीपक कदम, आनंद गांगुर्डे, मिलिंद निकम, अमोल जोशी, सुरेश पाटील, मनोहर खालकर, कैलास सातभाई आदी सहभागी झाले होते.