पर्यटकच नसल्याने वन्यजीवांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 08:52 PM2020-04-11T20:52:50+5:302020-04-12T00:28:09+5:30

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनमाणसांचीच नव्हे तर जंगलातील मुक्या प्राण्यांवरही अन्न व पाण्यावाचून उपासमारीची वेळ आल्याचे चित्र इगतपुरी-कसारादरम्यान महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असलेल्या उंटदरी परिसरात पाहावयास मिळत आहे.

 Hungry for wildlife, not just tourists | पर्यटकच नसल्याने वन्यजीवांची उपासमार

पर्यटकच नसल्याने वन्यजीवांची उपासमार

googlenewsNext

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनमाणसांचीच नव्हे तर जंगलातील मुक्या प्राण्यांवरही अन्न व पाण्यावाचून उपासमारीची वेळ आल्याचे चित्र इगतपुरी-कसारादरम्यान महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असलेल्या उंटदरी परिसरात पाहावयास मिळत आहे.
कोरोनामुळे लॉकडाउन झाल्यामुळे या क्षेत्रात कोणीही फिरकत नसल्यामुळे वन्यप्राण्यांचे अन्न व पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी महामार्गावर गस्त घालणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांची तहान व भूक भागवली जात असल्याचे गस्त अधिकारी रवि देहाडे व इतर कर्मचारी यांनी सांगितले. कसारा घाटाजवळील एक पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख असणाºया उंटदरी परिसरातील जंगलात अनेक प्राणी वास्तव्यास असून, लॉकडाउनमुळे या पर्यटन क्षेत्राच्या हद्दीत येण्यास शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. परिणामी या ठिकाणी कोणीही पर्यटक येत नसल्यामुळे येथील प्राण्यांना अन्न व खाण्याचे पदार्थ मिळत नाहीत. यामुळे या प्राण्यांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. सकाळी महामार्गावरील गस्त घालणारे अधिकारी रवि देहाडे व इतर कर्मचारी यांना भूकेने व तहानेने व्याकूळ झालेले माकडे त्यांच्या दिशेने पळत आल्याचे लक्षात येताच गस्त अधिकारी प्रमुख यांनी सदर मुक्या प्राण्यांना पाणी, बिस्किटे व खाण्याचे पदार्थ देऊन त्यांची भूक व तहान भागवली.

Web Title:  Hungry for wildlife, not just tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक