जनावरांच्या चाऱ्यासाठी शोधाशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 02:38 PM2018-10-17T14:38:26+5:302018-10-17T14:38:55+5:30
खामखेडा: चालू वर्षी अल्पशा पावसामुळे व मक्याच्या क्षेत्रात घट झाल्याने शेतकरी मक्याचा कडबा कोठे मिळतो का? याचा शोधार्थ फिरतांना दिसून येत आहे.
खामखेडा: चालू वर्षी अल्पशा पावसामुळे व मक्याच्या क्षेत्रात घट झाल्याने शेतकरी मक्याचा कडबा कोठे मिळतो का? याचा शोधार्थ फिरतांना दिसून येत आहे.
मका या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते.कारण या दिवसामघ्ये हमखास पैसा मिळवून देणारे पीक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे मोबलक मक्याचा कडबा मिळत असे. काही शेतकरी तर मक्याच्या कणसे मोडून देण्याचा बदल्यात मक्याचा कडबा कापणून घेऊन जात असे.काही शेतकरी तर मक्याचा चारा मोबलक असल्याने काही शेतकरी मक्याचा चारा विकून टाकत असे, तर काही शेतकरी आपले नातेवाईक ,सोयरे यांना मोफत देत असे. मका पिकाच्या जागेवर उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात घट होत असल्याने शेतकºयांनी कांद्याचे पीक चांगले यावे म्हणून या वर्षी मक्याची पेरणी कमी करून काही जमिनीत मका करण्या ऐवजी त्या जमिनीत ताग पिकाची पेरणी केली.कारण ताग पासून खत तयार होते. हे तागाचे खत कांद्यासाठी पोषक असते. त्यामुळे या वर्षी मक्याच्या पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे.
चालू वर्षी पाऊसाची सुरु वातीपासून वक्र दृटी आहे.सुरवातीच्या पाऊसावर शेतकर्याने अल्पशा पाऊसावर शेतकर्याने खिरपाच्या बाजरी,मका,ज्वारी आदी पिकाची पेरणी केली.पिकाची पेरणी केल्या नंतर थोडया फार प्रमाणात पाऊस पडत गेला.पिके लहान होती तो पर्यत पिके जोमात होती.परंतु ऐन दाणे भरण्याच्या वेळेस पाऊसाने ओढ दिल्याने पाण्या अभावी पिके शेतात वाळली गेली .त्यामुळे मक्याची पाहिजे त्याप्रमाणात वाढ झाली नाही.त्यामुळे चार्याची घट झाली आहे.पुढे
या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे जमिनीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही.त्यामुळे आतापासून दुष्काळजन्य परिस्थिती दिसून येत आहे.
आतापासून विहिरींनी तळ गाठायला सुरवात केली आहे.त्यामुळे जनावरांसाठी चारा करता येणार नाही.पुढे जनावरांसाठी चाº्याची आजच साठवणूक केलेली बरी म्हणून मक्याचा कडबा मिळतो का याची विचारणा करतांना शेतकरी दिसून येत आहे.काही शेतकरी तर आम्ही मक्याच्या कणसाची खुडणी करून देतो.त्याच्या मोबदल्यात आम्हाला चारा द्या,असे सांगत आहेत.परंतु चालू वर्षी अल्पशा पाऊसा आण िमक्याचा क्षेत्र घट त्यामुळे चारा कोणीही देण्यास तयार नाही.