चक्रीवादळ नुुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 10:17 PM2020-06-15T22:17:22+5:302020-06-16T00:07:32+5:30

नाशिक : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. या शेतकºयांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने भरपाईची मागणी शासनाला कळविली आहे.

Hurricane damage awaits | चक्रीवादळ नुुकसानभरपाईची प्रतीक्षा

चक्रीवादळ नुुकसानभरपाईची प्रतीक्षा

Next

नाशिक : मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे. या शेतकºयांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने भरपाईची मागणी शासनाला कळविली आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जोरदार वाºयासह कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वादळीवाºयाचा फटका बसल्याने शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या अधिकाºयांनी केले असून, प्राथमिक अहवालानुसानर ५१५ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले असून, मका, ऊस आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक फटका हा नाशिक, सिन्नर, निफाड आणि इगतपुरी तालुक्यांतील गावांना बसला सिन्नरमधील २३ गावांमध्ये पावसाने चांगलेच नुकसान केले. या तालुक्यातील ४६० शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले. भरवशाचे मका पीक वाया गेले आहे. नाशिक तालुक्यातील २४ गावांमधील २३८ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
मालेगाव, सटाणा, नांदागाव, इगतपुरी, निफाड, चांदवड या तालुक्यांमध्येदेखील काही प्रमाणात शेतकºयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ७७६ शेतकºयांना या पावसाचा फटका बसला यामध्ये सर्वाधिक सिन्नर तालुक्यातील शेतकºयांचा समावेश आहे. त्या खोलाखाल नाशिक तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मका, ऊस आणि भाजीपाला तसेच फळपिकांचे या पावसाने नुकसान केले आहे.
------------------------
जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती
जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकºयांचे चक्रीवादळ आणि पावसाने नुकसान केले आहे. मोठी जनावरे ४५, लहान जनावरे २८, कच्ची घरे ५००, पक्की घरे ४६, झोपड्या ४, पॉलीहाऊस १६, शेडनेट २०, पोल्ट्री ५, कांदाचाळ १०, गोठे २ याप्रमाणे जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती आहे.

Web Title: Hurricane damage awaits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक