दफ्तर सांभाळताना धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:48 AM2018-06-27T00:48:47+5:302018-06-27T00:51:50+5:30

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं व दफ्तर सांभाळतांना धांदल उडताना दिसत आहे.

Hurry while handling the office | दफ्तर सांभाळताना धांदल

दफ्तर सांभाळताना धांदल

Next
ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदीचा परिणाम : पावसापासून वह्या-पुस्तके वाचविण्यासाठी कसरत

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं व दफ्तर सांभाळतांना धांदल उडताना दिसत आहे.
सध्या अकरावी प्रवेशासह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्र्रक्रिया सुरू असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र सोबत घेऊन सायबर कॅफेसह मार्गदर्शन केंद्र, सुविधा केंद्र, रिपोर्टिंग सेंटर आणि शाळा महाविद्यालयांमध्ये फिरावे लागत आहे.
त्याचप्रमाणे प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले आदी विविध कागदपत्रं जमविण्यासाठी आणि ते प्रवेशप्रक्रियेत सादर करण्यासाठी पावसात फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यासाठी अतिमहत्त्वाचे असे हे कागदपत्रं भिजून खराब होण्याची भीती आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्रं अथवा दफ्तरातील वह्या पुस्तकांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापर येत नसल्याने पावसात महत्त्वाचे कागद आणि वह्या पुस्तके कशी जपावीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
शहरात प्लॅस्टिकबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिकची पिशवी वापरण्याविषयी भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी जाड फाइल व बॅगमधून कागदपत्रं घेऊन जात असले तरी अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने कागदपत्रं वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या इमारती, रस्त्यांच्या कडेची वृक्ष, बसस्थानके, चहाच्या टपºया व रस्त्यालगतच्या दुकानांच्या आश्रयाला उभे राहावे लागत असल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी व शाळा महाविद्यालयांमध्ये जाताना पाण्यापासून धोका असलेले कागदपत्रं आणि वह्या पुसके सांभाळायच्या कशा? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

पावसामुळे रेनकोटमध्येही पाणी शिरते. अशा पावसात पिशवी अथवा बॅगमध्ये कागदपत्र व प्रमाणपत्र ओले होऊन खराब झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे किमान विद्यार्थ्यांना तरी प्लॅस्टिक बंदीतून सवलत देण्याची गरज आहे.
-मयूर कोष्टी, विद्यार्थी

प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदपत्रं, प्रमाणपत्र ठेवले तर कितीही पावसात ते ओले होत नाही. परंतु, प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यामुळे प्रवेशासाठी बाहेर पडताना प्लॅस्टिकची पिशवी सोबत ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे दुकानदारांकडेही प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळत नसल्याने पाऊस थांबेपर्यंत तासनतास वाट पाहावी लागत असल्याने वेळ संपल्यास एकाच कामासाठी अनेक फेºया माराव्या लागतात.
- रितेश टिळे, विद्यार्थी

Web Title: Hurry while handling the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक