म्हसरूळला पती-पत्नीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:48 AM2019-11-18T01:48:21+5:302019-11-18T01:49:12+5:30
म्हसरूळ शिवारातील पेठरोडवरील एका बेकरीसमोर असलेल्या वेदनगरी येथील पती-पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१६) सायंकाळी उघडकीस आली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पंचवटी : म्हसरूळ शिवारातील पेठरोडवरील एका बेकरीसमोर असलेल्या वेदनगरी येथील पती-पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१६) सायंकाळी उघडकीस आली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनंजय सोनबा झगडे (६०) व लक्ष्मीबाई धनंजय झगडे (५५) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. वेदनगरी येथील ६८ क्रमांकाच्या रो-हाउसमध्ये झगडे दाम्पत्य काही दिवसांपासून राहत होते. शनिवारी रात्री ८ वाजेपूर्वी दोघा दाम्पत्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेत जीवनप्रवास संपविला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांना दोन मुलगे असून, ते रिक्षाचालक आहेत. याबाबत त्यांचे नातेवाईक अमित जगन्नाथ गायकवाड यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात खबर दिली. धनंजय यांनी हॉलमध्ये, तर पत्नी लक्ष्मीबाई हिने स्वयंपाक खोलीत छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांना आढळून आले. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.