पती-पत्नी ‘रेस्क्यू’ : ट्रेकिंगच्या थराराने रोमांच अन् उरात भरली धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 03:57 PM2019-05-26T15:57:56+5:302019-05-26T15:59:48+5:30

पोलीस नियंत्रण कक्षातून महापालिका आपत्ती निवारण कक्ष, सिडको अग्निशमन उपकेंद्राला माहिती कळविण्यात आली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन विभागाचे जवान पांडवलेणी डोंगराच्या दिशेने रवाना झाले.

Husband and wife 'Rescue': trekking tremors and thrills full of horror | पती-पत्नी ‘रेस्क्यू’ : ट्रेकिंगच्या थराराने रोमांच अन् उरात भरली धडकी

पती-पत्नी ‘रेस्क्यू’ : ट्रेकिंगच्या थराराने रोमांच अन् उरात भरली धडकी

Next
ठळक मुद्देडोळे गरगरू लागल्याने चक्कर जाणवण्यास सुरूवात झाली.ट्रेकिंगच्या धराराने उरात धडकी भरली

नाशिक : रविवारची सुटी पांडवलेणीच्या निसर्गरम्य वातावरणात एन्जॉय करायची म्हणून अशोकामार्ग परिसरातील एक दाम्पत्याने सकाळी लेणी गाठली. लेणीवर पोहचल्यानंतर ट्रेकिंगचा थरार अनुभवयाचा म्हणून या दाम्पत्याने नेहरू वनोद्यानाच्या बाजूने डोंगर सर करण्यास सुरूवात केली. डोंगराच्या माथ्यावर पोहचल्यानंतर डोळे गरगरायला लागल्याने खाली उतरण्याच्या वाटही धूसर दिसू लागल्या अन् ट्रेकिंगच्या धराराने उरात धडकी भरली, मग मदतीचा टाहो त्यांनी फोडला. तासभर पोलीस, अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू आॅपरेशन राबवून दोघांना सुखरूप खाली आणले.
रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने शामकांत प्रभाकर पाटील (४६) व त्यांची पत्नी विद्या पाटील (३५,रा. मातोश्री बंगला, अशोका मार्ग) हे दोघे नातेवाईक व मित्रमंडळी सोबत पांडवलेणी येथील डोंगरावर सकाळी आठ वाजता फिरण्यासाठी आले होते. पाटील यांच्यासोबत असलेले नातेवाईक व मित्रमंडळी पांडवलेणी फिरून झाल्यावर ते खाली उतरले. यावेळी पाटील दाम्पत्याला डोंगर सर करण्याचा मोह झाला. पांडवलेण्याच्या पाठीमागील भागातील डोंगर त्यांनी चढण्यास सुरूवात केली; मात्र डोंगराच्या माथ्यावर पोहचल्यानंतर जमिनीच्या दिशेने पुन्हा जाण्याचा मार्ग धुसर दिसू लागल्याने त्यांची पाचावर धारण बसली. डोळे गरगरू लागल्याने चक्कर जाणवण्यास सुरूवात झाली. दरम्यान, पोलीस नियचढून गेले परंतु उतरण्यास त्यांना मार्ग सापडला नाही अखेर त्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांचे नातेवाईक असलेले पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी संबंधित पोलीस अधिकारी बोरसे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पालीस निरिक्षक संजय सांगळे यांच्याशी संपर्क साधून माहिती कळविली. सांगळे यांनी तत्परतेने पोलीस नियंत्रण कक्षाला ‘कॉल’ दिला. पोलीस नियंत्रण कक्षातून महापालिका आपत्ती निवारण कक्ष, सिडको अग्निशमन उपकें द्राला माहिती कळविण्यात आली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन विभागाचे जवान पांडवलेणी डोंगराच्या दिशेने रवाना झाले. तसेच इंदिरानगर गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक विकास लोंढे, भगवान शिंदे, रमेश टोपले, रियाज शेख घटनास्थळी पोहचले.

Web Title: Husband and wife 'Rescue': trekking tremors and thrills full of horror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.