पतीने पत्नीला जाळून ठार मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:11 AM2018-06-15T01:11:00+5:302018-06-15T01:11:00+5:30

नाशिक : गंगापूररोडवरील ध्रुवनगर परिसरात एका गृहप्रकल्पाच्या साईटवर देखरेखीसाठी परप्रांतीय शाह दाम्पत्य राहात होते. संशयित पती समशेर अबलोश शाह याने पत्नी आयशा खातून शाह हिला मध्यरात्री ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून दिले. यात शंभर टक्के भाजल्याने आयशाचा मृत्यू झाला तर संशयित पती समशेरदेखील भाजला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Husband burns his wife | पतीने पत्नीला जाळून ठार मारले

पतीने पत्नीला जाळून ठार मारले

Next
ठळक मुद्देध्रुवनगर : संशयित आरोपीही भाजला

नाशिक : गंगापूररोडवरील ध्रुवनगर परिसरात एका गृहप्रकल्पाच्या साईटवर देखरेखीसाठी परप्रांतीय शाह दाम्पत्य राहात होते. संशयित पती समशेर अबलोश शाह याने पत्नी आयशा खातून शाह हिला मध्यरात्री ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून दिले. यात शंभर टक्के भाजल्याने आयशाचा मृत्यू झाला तर संशयित पती समशेरदेखील भाजला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ध्रुवनगर परिसरातील मराठी शाळेजवळील एका बांधकाम व्यावसायिकाच्या गृहप्रकल्पावर वॉचमन म्हणून सदनिकेत राहणाऱ्या शाह कुटुंबीय मूळ बिहार राज्यातील आहे. समशेर व आयशा या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वादविवाद झाले. मंगळवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास समशेर याने पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून मारले. दरम्यान, आगीची झळ बसल्याने संशयित समशेर काही प्रमाणात भाजल्याने त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गृहप्रकल्पाच्या ठेकेदाराने भिवंडी येथून या कुटुंबीयाला वॉचमन म्हणून कामावर ठेवले होते.
दरम्यान, एका वाटसरूने मंगळवारी रात्री ध्रुवनगर परिसरात वॉचमनच्या खोलीला आग लागल्याची माहिती गंगापूर पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असता त्यांनी तत्काळ विजेरीच्या प्रकाशात खोलीत जाण्याचा प्रयत्न केला असता प्रचंड धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.


पतीने पत्नीला
जाळून ठार मारले
(पान १ वरून)
त्यावेळी समशेर याची पत्नी आयशा पूर्णपणे भाजून मृत्युमुखी पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी समशेर हा खोलीमध्ये आगीच्या ज्वालांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी इतरत्र पळत होता. पोलिसांनी तत्काळ त्याला सुरक्षित बाहेर काढून ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केला असता कु ठल्याही प्रकारची आग घरामध्ये लागलेली नव्हती तर मयत आयशाचा पती संशयित समशेर याने ज्वलनशील पदार्थाच्या सहाय्याने पत्नीला जाळून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दत्तात्रय लहानू माळी (५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित समशेरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मोरे करीत आहेत.

Web Title: Husband burns his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा