नामपूरला पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीची पोलीस ठाण्यातच आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:11 AM2021-07-11T04:11:59+5:302021-07-11T04:11:59+5:30
पेंटरचा व्यवसाय करणारे प्रकाश निकम व छाया प्रकाश निकम अशी मृतांची नावे आहेत. छाया निकम यांनी शुक्रवारी (दि.९) ...
पेंटरचा व्यवसाय करणारे प्रकाश निकम व छाया प्रकाश निकम अशी मृतांची नावे आहेत. छाया निकम यांनी शुक्रवारी (दि.९) राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार झाले. सदर आत्महत्येच्या घटनेमुळे महिलेच्या माहेर व सासरच्या नातेवाइकांमध्ये वादविवाद निर्माण होऊ नये, म्हणून जायखेडा पोलिसांनी प्रकाश निकम यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या इमारतीतच प्रकाश निकम यांनी गळफास घेतला. रात्री त्यांचे शव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर नातेवाईक व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान, मालेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. मयत प्रकाश निकम यांचे इनकॅमेरा शवविच्छेदन होणार असून शवविच्छेदन अहवालानंतर खरी परिस्थिती समोर येईल, असे संबंधितांनी सांगितले. शनिवारी (दि.१०) जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक खांडवी यांनी जयखेडा पोलीस ठाण्याला भेट देऊन लॉकअपची पाहणी केली केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचारी तसेच निकम दांपत्याच्या नातेवाइकांचीदेखील कसून चौकशी केली.
फोटो; १० छाया निकम