डोक्यात मुसळचा प्रहार नवऱ्याने केले केले बायकोला ठार; अपघाताचा रचला होता बनाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 01:32 PM2023-07-01T13:32:48+5:302023-07-01T13:32:57+5:30
गेल्या बुधवारी (दि.28) ही खुनाची घटना घडली आहे. गेल्या बुधवारी हॉटेल जत्रा परिसरात असलेल्या श्रीरामनगर येथे ही घटना घडली होती.
संदीप झिरवाळ
पंचवटी : पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून तिच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून तिचा खून करत पत्नीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा बनाव करत अपघातात मृत्यू झाल्याचे भासवून पोलिस ठाण्यात खोटी माहिती देत खुनाचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आडगाव पोलिसांनी पतीसह भाच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
गेल्या बुधवारी (दि.28) ही खुनाची घटना घडली आहे. गेल्या बुधवारी हॉटेल जत्रा परिसरात असलेल्या श्रीरामनगर येथे ही घटना घडली होती.
श्रीरामनगर येथिल संतकृपा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या नंदा मच्छिंद्र चौरे (35) हिला कोणीतरी अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार सुरू असतांना तिचा मृत्यू झाला होता अशी तक्रार आडगाव पोलिस ठाण्यात संशयित आरोपी टेलर पतीने दिली होती.
सदर अपघात हा संशयास्पद असल्याने आडगाव पोलिसांनी माहिती घेत याबाबत पतिकडे कसून चौकशी केली असता त्याचे बिंग फुटले आणि त्याने पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून भाच्याच्या मदतीने तिच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून खून केला.
आडगाव पोलिसांनी या खून प्रकरणी टेलर व्यवसाय असलेल्या मूळ बीड जिल्ह्यातील व सध्या श्रीरामनगर संतकृपा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या पती मच्छिंद्र भगवान चौरे (40) व त्याचा भाचा सुरेश तुळशीराम कराड (19) या दोघांनाही अटक केली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक सुभाष जाधव तपास करत आहेत.