पतीने आवळला पत्नीचा गळा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 05:45 PM2019-12-10T17:45:35+5:302019-12-10T17:47:06+5:30
संत गाडगे महाराज पूलाजवळील मरीमाता झोपडपट्टीत शिला या आपल्या पती व चार मुलांसमवेत राहत होत्या. दोघे पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते.
नाशिक : किरकोळ कारणावरून पत्नीसोबत झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन दारूच्या नशेत पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गोदाकाठावरील मरीमाता झोपडपट्टीत घडल्याचे मंगळवारी (दि.१०) उघडकीस आली. खुनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशियत आरोपी पतीला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पती विजू केशव कामडी (३५) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विजू याने स्वत:ची पत्नी शिला कामडी (३०) हिचा गळा आवळून खून केल्याचे मयत शिलाच्या बहीण भारती विजय गजरे यांनी तक्र ारीत म्हटले आहे. संत गाडगे महाराज पूलाजवळील मरीमाता झोपडपट्टीत शिला या आपल्या पती व चार मुलांसमवेत राहत होत्या. दोघे पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास पती-पत्नीत वाद होऊन विजू याने शीलाचा कशाच्यातरी सहाय्याने गळा आवळून ठार केले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मद्यपी विजूला ताब्यात घेतले आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत पुढील तपास करीत आहेत. शहरात या पाच दिवसांत चार खूनाच्या घटना घडल्या आहेत.
गळा आवळल्यानंतर मेव्हणीकडे धाव
संशयित विजू याने पत्नी शीलाचा गळा आवळून ठार मारल्यानंतर तिच्या शरिरिाची हालचाल बंद झाल्याचे पाहून त्याने जवळच राहणाऱ्या मेव्हणी भारतीकडे धाव घेत माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी शीलाच्या घरी धाव घेत तीला उठविण्याचे प्रयत्न केले. ती शुध्दीवर येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान,घटनास्थळी पोलीस बीटमार्शलने धाव घेत पाहणी केली. मृतदेह संशयास्पद नसल्याने सुरु वातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रु ग्णालयात पाठविला मंगळवारी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. या अहवालात मयत महिलेचा गळा आवळल्याने खून श्वासोच्छवास थांबून मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानंतर पोलिसांनी संशयित तिचा पती विजू यास चौकशीसाठी ताब्यात घेतले व अकस्मात नोंद बदलून खूनाचा गुन्हा दाखल केला.