पतीनेच केली पत्नीची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:30 AM2017-10-09T00:30:25+5:302017-10-09T00:33:03+5:30
इंदिरानगर : नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल; दीड लाख रुपये घेतलेइंदिरानगर : स्वत:च्या पत्नीचा परपुरुषाबरोबर विवाह लावून त्याबदल्यात सुमारे दीड लाख रुपये घेऊन पत्नीची विक्री केल्याचा प्रकार इंदिरानगरमध्ये उघडकीस आला आहे़ विशेष म्हणजे विवाहापूर्वी संबंधित वराला वधू ही आपली पत्नी असल्याचे लपवून ठेवत बळजबरीने विवाह लावून दिला. या कृत्यास पती अमोल भालेराव याची आई, बहीण व तिच्या मित्रांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगरमधील महिलेचे अमोल भालेराव याच्यासोबत विवाह झालेला होता़ मात्र, कोणताही कामधंदा न करणाºया भालेराव यास पत्नीने अनेकदा कामाबाबत सूचनाही केली़ पती अमोल भालेराव हा पत्नीस सुरतहून म्हैसाना येथे घेऊन गेला.
तिथे तिची सासू ललिता भालेराव, नणंद मयूरी हरीश उघाडेसह मयुरीचा मित्र नितीन सारवान, मेघा सोलंकी व गोपाळ सोलंकी, प्रिया व तिचा नवरा नागेश हे सर्व भेटले. यानंतर ते राजस्थानमधील पाली येथील जैन भवनात गेले़
पाली येथील जैन भवनमध्ये विशाल जैन व त्यांच्या कुटुंबीयांना अमोल भालेराव याने पत्नीला विवाहासाठी दाखविण्याचा कार्यक्रम केला़ यावेळी सासूने मावशी, पतीने भाऊ व नणंद मयूरी हिने बहीण असल्याचे विशाल जैन यांना सांगून दुसºया दिवशी त्यांच्याशी विवाह लावून दिला़
विवाहानंतर अमोल भालेरावच्या पत्नीने जैन यांना आपले लग्न झालेले असल्याचे सांगताच जैन याने अमोल भालेराव यास एक लाख ६० हजार रुपये दिले असल्याचे सांगितले़ यानंतर जैन यांनी मनमाड येथील विवाहितेच्या वडिलांशी संपर्क साधला होता.व्यावसायिक अडचणीमुळे जैन यांनी विवाहितेस नाशिकला सोडू शकत नसल्याचे सांगितले़ त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच जैन यांना कोतवाली पोलीस ठाण्यात बोलावले असता त्याठिकाणी विवाहितेचा भाऊ राष्ट्रपाल पगारे व धम्मरत्न पाटील हे नाशिक पोलिसांसह दाखल झाले होते़ यानंतर विवाहितेस नाशिकला आणले असता तिने इंदिरानगर पोलीस ठाण्यात पती अमोल भालेराव, ललिता भालेराव, मयूरी भालेराव, नितीन सारवान, मेघा सोलंकी, गोपाळ सोळंकी यांच्याविरोधात विक्री केल्याची फिर्याद दिली़