पत्नीला कॉपी पुरविणाऱ्या शिक्षक पतीला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:00 AM2019-06-08T01:00:41+5:302019-06-08T01:01:33+5:30
येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी पुरविणाºया शिक्षक पतीला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयातील परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून, कॉपी पुरविणाºया शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच त्यांनी महाविद्यालयांच्या आवारातून पळ काढला. मात्र परीक्षा नियंत्रकांनी संबंधित विद्यार्थिनीचा पेपर काढून घेतल्याची माहिती परीक्षा केंद्रप्रमुख आर. डी. बच्छाव यांनी दिली.
नाशिक : येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी पुरविणाºया शिक्षक पतीला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयातील परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून, कॉपी पुरविणाºया शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच त्यांनी महाविद्यालयांच्या आवारातून पळ काढला. मात्र परीक्षा नियंत्रकांनी संबंधित विद्यार्थिनीचा पेपर काढून घेतल्याची माहिती परीक्षा केंद्रप्रमुख आर. डी. बच्छाव यांनी दिली.
महर्षी शिंदे अध्यापक महाविद्यालात शुक्रवारी (दि.७) सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पेपर सुरू झाल्यानंतर एक व्यक्ती संबंधित महिलेला कॉपी पुरवित असल्याचे येथील काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हा प्रकार प्राचार्यांच्या लक्षात आणून दिल. या दरम्यान संशयिताला पकडून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु, केंद्रप्रमुखांना या घटनेची माहिती दिली जात असताना संशयिताने परीक्षा केंद्रातून पळ काढला.
कॉपी पुरविणारा संशयित पेठ तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक असून परीक्षार्थी महिलेचा पती असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
परीक्षा यंत्रणेविषयी साशंकता
याप्रकरणी केंद्रप्रमुख आर. डी. बच्छाव यांच्याशी संपर्क साधला असता आपण वरच्या मजल्यावर असल्याने या प्रकाराची उशिरा माहिती मिळाल्याचे सांगत परीक्षार्थी महिलेवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, झालेल्या प्रकार परीक्षा नियंत्रकांसमोर घडल्यानंतरही झालेल्या गोंधळानंतर संशयिताला महाविद्यालयातून पळ काढण्याची संधी मिळाल्याने महाविद्यालयातील परीक्षा यंत्रणेविषयीच साशंकता निर्माण झाली आहे.