कवडासर येथील महिला सरपंचासह पतीचा खून

By admin | Published: June 14, 2015 11:48 PM2015-06-14T23:48:34+5:302015-06-14T23:49:26+5:30

कवडासर येथील महिला सरपंचासह पतीचा खून

Husband's assault with women's Sarpanch in Kawadasar | कवडासर येथील महिला सरपंचासह पतीचा खून

कवडासर येथील महिला सरपंचासह पतीचा खून

Next

दिंडोरी : तालुक्यातील कवडासर येथील वृद्ध महिला सरपंच व त्यांच्या पतीचा शेतातील घरात निर्घृण खून झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात मारेकऱ्यांनी तीक्ष्ण हत्त्याराने व दगडाने ठेचत सदर वृद्ध दांपत्याची क्रूर पद्धतीने हत्त्या केली आहे. हत्त्येचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस सर्व शक्यता गृहीत धरत तपास करत आहेत.
कवडासर येथील विद्यमान सरपंच सरूबाई जयराम गवळी (६५) व त्यांचे पती जयराम ढमा गवळी (७०) हे वृद्ध दांपत्य निचाईपाडा शिवारात वस्तीवर राहत होते. आज सकाळी निचाईपाडा येथील चौरंग पाडवी हा शेतात बैल बांधण्यासाठी गेला असता त्याला नाल्यात गवळी यांचा मृतदेह आढळून आला. त्याने घटनेची गावकऱ्यांना माहिती दिली. गावकायांनी ही घटना दिंडोरी पोलिसांना कळवली. सहायक पोलीस निरीक्षक भास्कर गणकवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत तपासकार्य सुरू केले; मात्र खुनाचे कारण समजू शकले नाही.
हत्त्या कुणी व कशासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदर दांपत्यास मूलबाळ नव्हते. त्यांनी बहिणीचा मुलगा पुंडलीक देवराम हिंडे यास दत्तक घेतले होते. तो गावात राहतो, तर जयराम गवळी हे भगतगिरी करत असल्याची चर्चा आहे. मयत महिलेचे सोन्याचे दागिने गायब असून, चोरीच्या कारणास्तव खून झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र पोलिसांनी यास दुजोरा न देत सर्व शक्यता पडताळून पाहत तपास सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या असून, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भास्कर गणकवार, हवालदार गवळी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Husband's assault with women's Sarpanch in Kawadasar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.