पत्नीचा खून करून पतीची आत्महत्त्या

By admin | Published: June 22, 2016 10:24 PM2016-06-22T22:24:05+5:302016-06-22T23:09:28+5:30

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्त्या

Husband's suicide by killing his wife | पत्नीचा खून करून पतीची आत्महत्त्या

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्त्या

Next

उमराणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीची निर्घृण हत्त्या करत झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना मालेगाव तालुक्यातील उमराणे येथे घडली.
उमराणे येथील धनशी शिवारात भगवान रतन बोरसे (४२) व पत्नी जयाबाई भगवान बोरसे (३६) हे दोन मुले व मुली समवेत वास्तव्यात होते. भगवान यास दारूचे व्यसन असल्याने पती-पत्नीत भांडण होत असे. मंगळवारी बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास दारू पिण्यास पैसे देण्या-घेण्याच्या वादातून भगवान याने कुऱ्हाडीने पत्नी जयाबाईच्या अंगावर वार केले. यात जयाबाई यांचा मृत्यू झाला. आरडाओरड ऐकून मुले जागी झाल्याचे पाहून भगवान याने पळ काढत दहिवड शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केली. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश माने, उपनिरीक्षक एम.पी. केदार आदिंसह जे.पी. गोसावी, प्रकाश सोनवणे, भाऊसाहेब आहेर घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)

Web Title: Husband's suicide by killing his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.