नाशिककरांना भरली हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 01:33 AM2021-12-20T01:33:51+5:302021-12-20T01:34:33+5:30
शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून रविवारी सकाळी किमान तापमानाचा पारा अधिकच घसरला. या हंगामात पहिल्यांदाच १२.५अंशापर्यंत तापमान मोजले गेले असून ही अतापर्यंतची नीचांकी नोंद ठरली आहे. पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून थंडीची तीव्रता अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
ref='https://www.lokmat.com/topics/nashik/'>नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून रविवारी सकाळी किमान तापमानाचा पारा अधिकच घसरला. या हंगामात पहिल्यांदाच १२.५अंशापर्यंत तापमान मोजले गेले असून ही अतापर्यंतची नीचांकी नोंद ठरली आहे. पुढील आठवडाभर हवामान कोरडे राहणार असून थंडीची तीव्रता अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. नाशिककरांना मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका अनुभवयास येत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली असून गोदाकाठावर तसेच विविध झोपडपट्टयांसह शहराजवळील मळे परिसरात शेकोट्या पेटलेल्या दिसू लागल्या आहेत. थंडीची तीव्रता या आठवड्यात चांगलीच वाढली आहे. मागील आठवड्यात शहरात किमान तापमान १४ ते १५अंशाच्या जवळपास राहत होते तर कमाल तापमान २९अंशाच्या आसपास राहत होता. या आठवड्यात मात्र कमाल-किमान तापमानात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच गेल्या आठवड्यात काही दिवस शहरात ढगाळ हवामानदेखील होते, यामुळे थंडीची तीव्रता फारशी वाढलेली जाणवत नव्हती. या आठवड्यात संपुर्णपणे आकाश निरभ्र असून हवामान कोरडे असल्याने थंडी वाढू लागली आहे. कमाल तापमान २६अंशापर्यंत खाली आले आहे. थंडीच्या तीव्रतेमुळे पुन्हा एकदा नाशिककरांनी ऊबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला आहे. सकाळी फेरफटका मारणाऱ्यांच्यासंख्याही काही प्रमाणात रोडावल्याचे दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. सुर्यदर्शन झाल्यानंतर नागरिक मॉर्निंग वॉक करण्यास पसंती देऊ लागले आहे. तसेच दिवसभरसुद्धा वातावरणात गारवा जाणवू लागला आहे.