वसंत करंडकमध्ये "लाली"ची बाजी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 10:45 PM2021-03-18T22:45:14+5:302021-03-19T01:28:17+5:30
नाशिक : वसंत करंडक एकांकिका स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांमधून सपान थिएटर्सच्या ह्यलालीह्ण या एकांकिकेने बाजी मारली. अभिनयासाठी प्रथम पारितोषिक लालीतील भूमिकेसाठी प्रणव सपकाळे तर महिलांमध्ये अभिनयासाठी बाई जरा कळ काढा एकांकिकेतील भूमिकेसाठी पूजा पूरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिग्दर्शनातील प्रथम पुरस्कार लालीसाठी राहुल गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
नाशिक : वसंत करंडक एकांकिका स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांमधून सपान थिएटर्सच्या "लाली" या एकांकिकेने बाजी मारली. अभिनयासाठी प्रथम पारितोषिक लालीतील भूमिकेसाठी प्रणव सपकाळे तर महिलांमध्ये अभिनयासाठी बाई जरा कळ काढा एकांकिकेतील भूमिकेसाठी पूजा पूरकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर दिग्दर्शनातील प्रथम पुरस्कार लालीसाठी राहुल गायकवाड यांना प्रदान करण्यात आला.
कालिदास कलामंदिरात कॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कलच्या वतीने बुधवारी या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात केटीएचएम कॉलेजची भोकरवाडीचा शड्डू या एकांकिकेने व्दितीय स्थान तर उत्तेजनार्थ एकांकिका म्हणून नाट्यसेवाच्या बाई जरा कळ काढा एकांकिकेला गौरविण्यात आले.
लेखनासाठीचे विशेष पारितोषिक लालीसाठी कृष्णा वाळके यांना प्रदान करण्यात आले. तर पुरुष आणि महिला अभिनयातील व्दितीय अनुक्रमे किरण जायभावे आणि मानसी गोसावी यांना गौरविण्यात आले. तर अभिनयात उत्तेजनार्थ पारितोषिक बळीराम शिंदे, दामिनी जाधव, शुभम दाणी यांना देण्यात आले.
तर दिग्दर्शनातील व्दितीय भोकरवाडीचा शड्डूसाठी रोहित जाधव यांना प्रदान करण्यात आला. तर प्रकाशयोजनेसाठी मोहन आगवणे, कृतार्थ कन्सारा तर पार्श्वसंगीतासाठी जीतेंद्र सोनार, आनंद, शुभम, वैभव यांनातर आणि नेपथ्यासाठी ऊर्वश, चेतन, सौरभ यांना तसेच राहुल, प्राजक्त यांना प्रदान करण्यात आले.
जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धेतील विजेत्यांचे बक्षिस वितरण अखिल भारतीय नाट्य परिषद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेचे परिक्षण आनंद ओक व प्रफुल्ल दीक्षित यांनी केले. पुरस्कार प्रदान सोहळ्यास वसंत ठाकुर , शाहु खैरे , वत्सला खैरे , राजेंद्र बागुल , धोंडीराम बोडके , आशा ताडवी , विरेंद्रसिंह टिळे, आनंद ओक , प्रफुल्ल दीक्षित, भूषण भावसार , ओमकार टिळे, संतोष हिवाळे , कैलास काळे, विजय परदेशी, राहुल पगार रोहित ठाकूर उपस्थित होते.
वसंत करंडकातील पुरस्कार विजेत्यांसमवेत वसंत ठाकुर , शाहु खैरे , वत्सला खैरे , राजेंद्र बागुल , धोंडीराम बोडके , आशा ताडवी , विरेंद्रसिंह टिळे, आनंद ओक, प्रफुल्ल दीक्षित आदी