संकरित जनावरांत कोकणवाडीचा वळू चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:16 AM2018-02-25T00:16:31+5:302018-02-25T00:16:31+5:30

ग्रामपालिका आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती यांच्या विद्यमाने आयोजित घोटीतील डांगी, औद्योगिक, शेतकी आणि संकरित जनावरांत अव्वल चॅम्पियन येण्याचा मान अकोले तालुक्यातील कोकणवाडी येथील चंद्रकांत बेंडकुळी यांच्या वळूला मिळाला आहे. या वळूच्या पशुपालकाला राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Hybrid animals Konkanwadi bull champion | संकरित जनावरांत कोकणवाडीचा वळू चॅम्पियन

संकरित जनावरांत कोकणवाडीचा वळू चॅम्पियन

googlenewsNext

घोटी : ग्रामपालिका आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती यांच्या विद्यमाने आयोजित घोटीतील डांगी, औद्योगिक, शेतकी आणि संकरित जनावरांत अव्वल चॅम्पियन येण्याचा मान अकोले तालुक्यातील कोकणवाडी येथील चंद्रकांत बेंडकुळी यांच्या वळूला मिळाला आहे. या वळूच्या पशुपालकाला राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.  घोटीतील डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा आजच्या दुसºया दिवशी बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या समारंभात विजेत्या वळूच्या पशुपालकांना दादा भुसे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार हेमंत गोडसे हे होते.  यावेळी बोलताना दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, धरणाचा तालुका अशी ओळख असणाºया इगतपुरी तालुक्यातील  पाण्यावर स्थानिक नागरिकांचा अधिकार नसल्याची
कल्पना शासनाला असून, या पाण्याच्या कराच्या मोबदल्यात रॉयल्टी आणि स्थानिक युवकांना रोजगार तसेच सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमित लाभार्थींना त्यांच्या नावाने जमीन आणि घरे करण्याचे शासनाच्या विचाराधिन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  या बक्षीस वितरण समारंभास माजी आमदार शिवराम झोले, काशीनाथ मेंगाळ, निवृत्ती जाधव, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, कावजी ठाकरे, पंचायत समिती सदस्य विठ्ठल लंगडे, मच्ंिछद्र पवार, रघुनाथ तोकडे, मूलचंद भगत, अशोक सुरडे, कुलदीप चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णू गर्जे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी संभाजी आव्हाड आदी उपस्थित होते. दरम्यान, रविवारी (दि. २५) कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचा निकाल : शेरणखेल येथील वळू ठरला द्वितीय  प्रदर्शनात चॅम्पियनमध्ये कोकणवाडी येथील चंद्रकांत बेंडकुळी, डांगी आदतमध्ये प्रथम अकोले तालुक्यातील मुथळने येथील सदाशिव सदगीर, द्वितीय अकोले तालुक्यातील शेरणखेल येथील ज्ञानदेव कासार, चार दाती :- मेहदूरी, ता. अकोले भगवान वाव्हळे. सहा दाती :- चंद्रकांत बेंडकुळी, डांगी जुळलेले :- रोहित मोरे (आगसखिंड) बैलजोडी :-रमेश पोटकुळे (शेणवड खुर्द), डांगी कालवड :- सुरेश लोखंडे (धामणगाव पाट), डांगी दुभती- दादा गोडसे (मोग्रस), गाभण- नवनाथ तुपे (बेलू), खिल्लार आदत-गोविंद कडू (तळोघ), दोन दाती: चांगदेव तोकडे (देवळे) चार दाती : गोरख गिते (तळोशी), सहा दाती :- जालिंदर चव्हाण (माणिकखांब), खिल्लार बैलजोडी- झिपार आडोळे (टाके घोटी), संकरित कालवड- संदीप नागरे (नाशिकरोड), घोडा- कैलास कर्पे (नांदूरवैद्य), देवीदास भगत (घोटी वाडी) आदींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.

Web Title: Hybrid animals Konkanwadi bull champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक