हैदराबाद, दिल्ली विमानसेवेचे लवकरच टेकऑफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 01:49 AM2022-06-25T01:49:28+5:302022-06-25T01:50:32+5:30

- आधी कोराेना आणि नंतर तांत्रिकमुळे वर्षभरापासून बंद असलेली स्पाईस जेटची विमानसेवा लवकरच सुरू हेाण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसात नाशिक- हैदराबाद आणि नाशिक-दिल्ली ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्याचे वेळापत्रकही कंपनीने जाहीर केले आहे.

Hyderabad, Delhi Airlines take off soon | हैदराबाद, दिल्ली विमानसेवेचे लवकरच टेकऑफ

हैदराबाद, दिल्ली विमानसेवेचे लवकरच टेकऑफ

Next
ठळक मुद्देउडान होणार: गोडसे यांनी दिली माहिती, कंपनीकडून वेळपत्रक जाहीर

नाशिक - आधी कोराेना आणि नंतर तांत्रिकमुळे वर्षभरापासून बंद असलेली स्पाईस जेटची विमानसेवा लवकरच सुरू हेाण्याची चिन्हे आहेत. येत्या काही दिवसात नाशिक- हैदराबाद आणि नाशिक-दिल्ली ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्याचे वेळापत्रकही कंपनीने जाहीर केले आहे.

खासदार हेमंत गोडसे यांनीही माहिती दिली. नाशिक-हैदराबाद आठवड्यातून सहा दिवस तर नाशिक -दिल्ली विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असणार आहे. नाशिक -हैद्राबाद आणि नाशिक -दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होणार असल्याने व्यापारी, उद्योजक उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन वर्षांपासून विमानसेवा बंद झाल्याने व्यापारी आणि उद्योजकांमध्ये नाराजी व्यक्त हाेत हाेती. कंपनीने नाशिक - हैदराबाद, नाशिक - दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी खासदार गोडसे यांनी कंपनीशी पत्रव्यवहार केला होता. आता ही सेवा लवकरच सुरू होणार असून स्पाइस जेट कंपनी प्रशासनाने शुक्रवारी (दि.२४) खासदार गोडसे यांना नाशिक - हैदराबाद आणि नाशिक - दिल्ली या दरम्यानच्या हवाई सेवेचे वेळापत्रक पाठविले आहे. नाशिक -हैदराबाद विमानसेवा शनिवार वगळता रोजच तर नाशिक - दिल्ली विमानसेवा रोजच उपलब्ध असणार आहे. हैदराबाद - नाशिक हे विमान हैदराबाद येथून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी निघणार असून तेच विमान पुन्हा सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ओझर येथून हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे. दिल्ली -नाशिक हे विमान सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी रोज दिल्ली येथून नाशिकसाठी उड्डाण घेणार असून तेच विमान नाशिकहून पुन्हा दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी दिल्लीसाठी टेक- अप होणार आहे. नाशिक - हैदराबाद या विमानात प्रवाशांची क्षमता ८० असणार असून हा प्रवास अवघ्या ९० मिनिटांचा रहाणार आहे. तर नाशिक -दिल्ली विमानात विमानात १८९ प्रवाशांची आसन क्षमता असणार असून प्रवास दोन तासांचा असणार आहे.

Web Title: Hyderabad, Delhi Airlines take off soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.