पाटोदा परिसरात हायड्रोकार्बन सर्वेक्षण सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 06:53 PM2019-01-01T18:53:18+5:302019-01-01T19:10:17+5:30

येवला तालुक्यातील पाटोदा परिसरातील काही गावांमध्ये पाच दिवसांपासून केंद्र शासनाच्या वतीने हायड्रोकार्बनशोध मोहीम राबविली जात आहे. या शोधमोहिमेअंतर्गत यंत्रणेने चांदवड तालुक्यातील तळेगाव, समिट स्टेशनपासून ते येवला तालुक्यातील नळखेडे,लौकी शिरस, पाटोदा पठाणनाला,शिरसगाव,जऊळके,देशमाने,गावापर्यंतच्या लांबीच्या परिघात प्रत्येकी (बोअरवेल ) होल घेऊन त्यातील भूगर्भाचे एक्सरे द्वारे नमुने घेतले जात आहे. या भागात सुमारे वीस किलोमीटरच्या परिघात पंधराते वीस फुटांच्या अंतरावर होल घेऊन अक्षरश:चाळणी केली आहे.

 Hydrocarbon surveys in Patoda area started | पाटोदा परिसरात हायड्रोकार्बन सर्वेक्षण सुरु 

पाटोदा परिसरात हायड्रोकार्बन सर्वेक्षण सुरु 

Next

परिसरातील नागरिकही कुतूहलापोटी हि यंत्रणापाहण्यासाठी गर्दी करीत आहे. या हजारो होलांमध्ये गेल्या दोन स्फोट केले जात असून त्यातील नमुनेसंकलित केले जात आहे. या स्फोटांमुळे विहिरी तसेचिवंधन विहिरींच्या आसपास असलेले पाणी दिशाबदलत ,अन्यत्र प्रवाहित होत असल्याची शंका शेतकरीवर्गामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आधीच याभागात गेल्या पाच सहा वर्षांपासून सतत दुष्काळीस्थिती असल्यामुळे या भागातील भूगर्भातीलपाण्याची पातळी खालावलेली आहे. असतांनाच या यंत्रणे मार्फत भूगर्भात स्फोट घडवले जात असल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. केंद्र शासनाच्या वतीने ही शोध मोहीम सुरु आहे या भागात हायड्रोकार्बन साठे असल्याचे सॅटेलाईटद्वारे दिसून आल्याची चर्चाआहे. हे साठे तपासण्यासाठी सेमिक्स डाटा संकलित करण्याचे काम झाले असून त्यानुसार सर्वेक्षण झालेआहे.ओएनजीसी कंपनीने गेल्या पाच दिवसांपासून प्रत्यक्ष काम सुरु केले आहे. या भागात यापूर्वीहीअशी यंत्रणा राबवून शोध घेतला गेला आहे.पुन्हा तीच यंत्रणा या भागात आली असून गेल्या 28डिसेंबर पासून हे काम सुरु असल्याने या भागात खरच हायड्रोकार्बनचे साठे आहेत का असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थांना पडला आहे. या यंत्रणेने रोही ,नीलखेडेशिवार ,पाटोदा,लौकी शिरसगाव,देशमाने ,मानोरी आदी भागात हजारो बोअरवेल घेतलेले असून त्यांतील जमिनीच्या भूगर्भाचा एक्सरे घेतला जात असून माहिती संकलित केली जात आहे. या भागातील जमिनीचे सॅटेलाईट माध्यमातून सर्वेक्षण करण्यातआले . त्यानुसार या भागात जमिनीत बोअरवेल (होल )करून तेथील नमुने घेतले जात आहे . नमुने घेतल्यानंतर या होलांमध्ये स्फोट केले जात आहे व पुन्हा नमुने घेतले जात आहे.हे सर्व नमुने संकलित करून चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. सण 2005 मध्ये मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यापासून या सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ करण्यात येऊन चाचणी घेण्यात आली होती तेव्हापासून हि यंत्रणा सॅटेलाईटच्या माध्यमातून सर्वेक्षण करून माहिती संकलित करीत असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title:  Hydrocarbon surveys in Patoda area started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.