नांदगाव शाळेत जलसाक्षरता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 06:29 PM2019-07-16T18:29:40+5:302019-07-16T18:30:02+5:30

नांदगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत जलशक्ती अभियान अंतर्गत जलसाक्षरता अभियानदिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी जलसाक्षरता शपथ घेतली.

Hydroculture campaign at Nandgaon School | नांदगाव शाळेत जलसाक्षरता अभियान

नांदगाव शाळेत जलसाक्षरता अभियान

googlenewsNext
ठळक मुद्देसायखेडा विद्यालयात जलदिंडी

देवगाव : नांदगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत जलशक्ती अभियान अंतर्गत जलसाक्षरता अभियानदिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी जलसाक्षरता शपथ घेतली. मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे जीवनातील महत्त्व व पाणी बचत याबद्दल मार्गदर्शन केले. उपशिक्षक प्रशांत तुपे यांनी विद्यार्थ्यांना पाणी बचत व शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी घोषणा फलक घेऊन गावात फेरी काढून जलसाक्षरता दिंडी काढली. शाळेजवळच शोषखड्डा करण्यात येऊन शाळेच्या खोल्यांना लोकसहभागातून पन्हाळीही बसविण्यात आलेली आहे. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. जलसाक्षरता अभियान यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रमेश सोनवणे, लहानू गावडे, अनिता वारूंगसे, जुबीन शाह, प्रशांत तुपे, अशोक गवळी, सुकरी भोये यांनी परिश्रम घेतले.
सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात जलशक्ती अभियानानिमित्त जलदिन, जलप्रतिज्ञा, जलदिंडी या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जल साक्षरतेवर प्राचार्य बी.के. सूर्यवंशी यांनी उद्बोधन केले. ते म्हणाले, आज पाणी जर वाचवले तरच भविष्यात आपले जीवन सुखी असेल अन्यथा पाण्याच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. यावेळी जलप्रतिज्ञा अशोक गावले यांनी विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली. यावेळी पर्यवेक्षक एम.एम. शिरसाट, रमेश अडसरे, श्रीमती जाधव, संजय चौधरी, अवधूत आवारे, राजेंद्र कदम, रामकृष्ण भामरे, अशोक टर्ले, अशोक गावले, सोमनाथ शिंदे, ज्ञानेश्वर कर्पे, शरद वाणी, विलास महाले, मोहन क्षीरसागर, किरण तांदळे उपस्थित होते. गावातून जलदिंडी काढण्यात आली. सायखेडा गावातील चौकाचौकातून जलदिंडी नेऊन जलसाक्षरतेचा संदेश विद्यार्थ्यांनी नागरिकांना दिला. दिंडीमध्ये शालेय पर्यावरण मंडळ, शालेय विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
सागपाडा शाळेत वृक्षदिंडी
वणी-सापुतारा रस्त्यावरील सागपाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वृक्षदिंडी व वृक्षारोपण करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. बालवयोगटातील विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या. यावेळी बबिता सूर्यवंशी, पपू रेहरे, पवार, आरती दुबे, सुनीता पाटील, दिलीप चव्हाण, अंगणवाडीसेविका आशा कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Hydroculture campaign at Nandgaon School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.