दह्याणे येथील पाझर तलावाचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:30 AM2019-08-09T00:30:05+5:302019-08-09T00:31:17+5:30

चांदवड : तालुक्यातील दह्याणे येथील भोहनदरा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने अ‍ॅड. शांताराम भवर व ग्रामस्थांनी जलपूजन केले.

Hydropower of the leisure pond at Dahyane | दह्याणे येथील पाझर तलावाचे जलपूजन

दह्याणे येथील भोहनदरा पाझर तलावचे जलपूजन करताना शांताराम भवर, शिवाजी पगार, नाना पूरकर, नारायण भवर, पंढरीनाथ पवार आदी.

Next
ठळक मुद्देसलग तीन वर्षे लोकसहभागातून हजारो ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला.

चांदवड : तालुक्यातील दह्याणे येथील भोहनदरा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने अ‍ॅड. शांताराम भवर व ग्रामस्थांनी जलपूजन केले.
शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेतून जुना भोहनदरा पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम झाले आहे. सलग तीन वर्षे लोकसहभागातून हजारो ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. त्यामुळे पाझर तलावाची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असून, या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने पाझर तलाव भरून वाहू लागला. बुधवारी पाझर तलावाच्या सांडव्यातून
पाणी आल्यानंतर ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले. सदर पाझर तलावातील पाणीसाठा वाढल्यामुळे निश्चितच उन्हाळ्यात याचा फायदा गावाला होणार आहे.
दरम्यान, दह्याणेचे माजी सरपंच अ‍ॅड. शांताराम भवर, शिवाजी पगार, नाना पूरकर, नारायण भवर, पंढरीनाथ पवार, अशोक वैद्य, संजय तिडके, श्रावण हिंगले, लहानू चौधरी, सुरेश पूरकर, भगीरथ भवर, शरद भवर, सुनील भवर यावेळी उपस्थित होते.

Web Title: Hydropower of the leisure pond at Dahyane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण