मुखेड फाटा येथे रस्त्यावर भजन

By Admin | Published: June 6, 2017 02:27 AM2017-06-06T02:27:31+5:302017-06-06T02:27:42+5:30

येवला : नाशिक-औरंगाबाद महामार्ग अडवून मुखेड फाटा येथे तासभर रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला.

Hymns on the road at Mukhed Phata | मुखेड फाटा येथे रस्त्यावर भजन

मुखेड फाटा येथे रस्त्यावर भजन

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : नाशिक-औरंगाबाद महामार्ग अडवून मुखेड फाटा येथे तासभर रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. मानोरी येथील वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळाने भजन म्हणत रस्त्यावर ठिय्या देत सरकारचा निषेध केला. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडवण्यात येऊन शेतमालाची वाहतूक होत नाही ना याची तपासणी करण्यात आली. यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता.
सोमवारी सकाळी साडेसात वाजता मुखेड फाट्यावर महामार्ग अडविण्यात आला. परिसरातील मुखेड, मुखेड फाटा, मानोरी, देशमाने, जऊळके, जळगाव नेऊर आदी गावांतील शेतकरी रस्त्यावर उतरल्याने गर्दी वाढत होती. जशी गर्दी वाढत होती तसा शेतकऱ्यांच्या भाषणांनी जोर धरला. त्यामुळे पोलीस यंत्रणा हतबल झाली होती. तब्बल तासाभरानंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व सहायक पोलीस उपनिरीक्षक तांदळकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेने प्रयत्न केला.
रास्ता रोको करण्यासाठी मुखेडला बाळासाहेब अहेर, भगवान जाधव, रवींद्र अहेर, कल्याणराव अहेर, सोमनाथ अहेर, दीपक मोगल, विजय अहेर, रवींद्र दराडे, विलास अहेर, महेश अनर्थे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात उतरले होते. येथे शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात येऊन शासनाचा निषेध करण्यात आला.
रास्ता रोको आंदोलनात जिल्हा परिषद
सदस्य संजय बनकर, दिनकर तिपायले, सदाभाऊ शेळके, शंकर चिने, योगेश गांगुर्डे, संजय जाचक, सौरभ तिपायले, सुरेश दुघड, आप्पासाहेब शेळके, बाबूराव शेळके, मच्छिंद्र वावधाने, राजू शेळके, संतोष अहेर, विलास शेळके, दिगंबर तिपायले, सुनील शेळके, राहुल शेळके, गोकुळ शेळके, विजू शेळके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सामील झाले होते.

Web Title: Hymns on the road at Mukhed Phata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.