अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 01:27 IST2022-02-28T01:26:51+5:302022-02-28T01:27:09+5:30
अल्पवयीन मुलाला राहत्या घरात बोलावून त्याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग
सिडको : अल्पवयीन मुलाला राहत्या घरात बोलावून त्याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित महेंद्र गोविंद पंडित (४०) याने पीडिताच्या पायाला सूज आली असल्याने त्यावर उपचाराकरिता मलम देतो असे सांगून पीडिताला राहत्या घरी बोलाविले. त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अतिप्रसंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.