अजून मी म्हातारा झालेलो नाही! : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:31 AM2019-04-25T01:31:00+5:302019-04-25T01:31:48+5:30

नोटबंदीनंतर मला १०० दिवस द्या, सर्व काळा पैसा बाहेर येईल आणि लोकांचे हाल थांबतील अन्यथा मला चौकात बोलावून जी शिक्षा द्यायची ती भोगायला तयार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते

I am not old yet! : Sharad Pawar | अजून मी म्हातारा झालेलो नाही! : शरद पवार

अजून मी म्हातारा झालेलो नाही! : शरद पवार

Next

निफाड : नोटबंदीनंतर मला १०० दिवस द्या, सर्व काळा पैसा बाहेर येईल आणि लोकांचे हाल थांबतील अन्यथा मला चौकात बोलावून जी शिक्षा द्यायची ती भोगायला तयार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. आता मोदीना कोणत्या चौकात घ्यायचे असे सांगत राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी अजून म्हातारा झालेलो नाही, मोदी सरकारला खाली बसवल्याशिवाय मी थांबणार नाही, त्यासाठी राज्यभर सभा घेणार असल्याचे ठणकावून सांगितले.
दिंडीरी लोकसभा मतदार संघातील महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ निफाड येथे आयोजित सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे होते. पवार पुढे म्हणाले की, मोदींची एक सवय आहे. मला इतक्या दिवसाची मुदत द्या, मी काम करतो. काळा पैसा व इतर प्रश्नांवर त्यानी मुदत सांगितली पण त्या मुदतीत त्यांनी कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत.
पिकवणारा जगवायला पाहिजे
सभेत शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका केली. पवार म्हणाले, भाजपवाले म्हणतात की तुम्ही शेतमाल पिकवणाऱ्यांचा विचार करतात खाणाºयांचा नाही. पण खाणारा जगवायचा असेल तर पिकवणारा जगवायला पाहिजे, असे पवार यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून पवार यांच्या विधानाचे स्वागत केले.
च्येवला तालुक्यातील शेतकरी कृष्णा डोंगरे हे अंगात शर्ट न घालता स्टेजवर आले व या सरकारच्या काळात होणाºया त्रासाबद्दल पवार यांना निवेदन दिले.

Web Title: I am not old yet! : Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.