मी जबाबदार माझ्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:20 AM2021-09-10T04:20:04+5:302021-09-10T04:20:04+5:30
जगभरात दहशत पसरलेल्या कोरोनावर अद्याप ठोस औषधोपचार उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे यासारखी खबरदारी ...
जगभरात दहशत पसरलेल्या कोरोनावर अद्याप ठोस औषधोपचार उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे यासारखी खबरदारी घेत प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना शासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. मात्र एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असतांना दुसरीकडे शहरातील कोरोना नियंत्रणाची मुख्य जबाबदारी असलेल्या नाशिक मनपा मुख्यालयातच आयुक्तांच्या दालनाबाहेर प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली होत आहे.
मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेरील ' मी जबाबदार माझ्या आ
रोग्याच्या सुरक्षेसाठी ' हा जनजागृती करणारा जनहितार्थ फलक झळकत असताना उपस्थित कर्मचारी व सुरक्षा रक्षक मात्र बघ्यांच्या भूमिकेत असल्याने कोविड -१९ संसर्गाचा धोका संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. (छाया : राजू ठाकरे)
090921\09nsk_13_09092021_13.jpg
मी जवाबदार माझ्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी...जगभरात दहशत पसरलेल्या कोरोनावर अद्याप ठोस औषधोपचार उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे यासारखी खबरदारी घेत प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना शासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. मात्र एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत असतांना दुसरीकडे शहरातील कोरोना नियंत्रणाची मुख्य जबाबदारी असलेल्या नाशिक मनपा मुख्यालयातच आयुक्तांच्या दालनाबाहेर प्रतिबंधात्मक नियमांची पायमल्ली होत आहे. मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेरील ' मी जवाबदार माझ्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी ' हा जनजागृती करणारा जनहितार्थ फलक झळकत असतांना उपस्थित कर्मचारी व सुरक्षा रक्षक मात्र बघ्यांच्या भूमिकेत असल्याने कोविड -19 संसर्गाचा धोका संपला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. ( छाया : राजू ठाकरे )