मेरे श्याम को मनाने चले आये हैं दिवाने...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:32 AM2018-07-30T00:32:59+5:302018-07-30T00:33:19+5:30
‘मेरे श्याम को मनाने चले आयें हैं दिवानें..., जग हो रहा दिवाना खाटू के श्याम का..., डंका तो बज रहा हैं खाटू के श्याम का..., अशा एकापेक्षा एक सरस भजनांचे सुमधूर गायनात भक्त तल्लीन झाले. कोलकाता येथील रामअवतार अग्रवाल आणि मीना परुळेकर निकम या गायकांनी विविध रचना सादर करून भजन संध्या उत्तरोत्तर खुलविली.
नाशिक : ‘मेरे श्याम को मनाने चले आयें हैं दिवानें..., जग हो रहा दिवाना खाटू के श्याम का..., डंका तो बज रहा हैं खाटू के श्याम का..., अशा एकापेक्षा एक सरस भजनांचे सुमधूर गायनात भक्त तल्लीन झाले. कोलकाता येथील रामअवतार अग्रवाल आणि मीना परुळेकर निकम या गायकांनी विविध रचना सादर करून भजन संध्या उत्तरोत्तर खुलविली. निमित्त होते, श्री श्याम सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने गंगापूररोडवरील नक्षत्र लॉन्समध्ये रविवारी (दि.२९) खाटूधामच्या श्री श्यामबाबा यांचा झुला महोत्सवाचे. यावेळी श्री श्यामबाबा यांचा आकर्षक फुलांचा दरबार लक्षवेधी ठरला. या दरबाराची सजावट मुंबई येथील राजेश जीवराजका, प्रमोद मुरारका, प्रदीप बागडीया यांनी केली होती. मुख्य पूजा दीपक मोहनशरण अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आली. उत्तरोत्तर रंगलेल्या गीतगायनाच्या मैफलीत समाजबांधव तल्लीन झाले. पंकज परशरामपुरीया, सुशील केडिया, निळकंठ पाटील, जुगल देवडा, ललित रुंग्टा, पवन शर्मा, किशोर संघई, भगवानदास अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.