मोदींनी केलेली स्तुती ऐकून मी मेलोच - शरद पवार

By Admin | Published: January 5, 2017 04:35 PM2017-01-05T16:35:39+5:302017-01-05T19:25:54+5:30

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 5 - मोदींनी माझे बोट धरून राजकारणात आल्याचं म्हटलं, त्यांचे हे कौतुकास्पद उद्गार  ऐकून मी ...

I heard the praise of Modi - Sharad Pawar | मोदींनी केलेली स्तुती ऐकून मी मेलोच - शरद पवार

मोदींनी केलेली स्तुती ऐकून मी मेलोच - शरद पवार

Next

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 5 - मोदींनी माझे बोट धरून राजकारणात आल्याचं म्हटलं, त्यांचे हे कौतुकास्पद उद्गार  ऐकून मी मेलोच, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोलेबाजी केली. मोदी बोलायला फारच हुशार असल्याचं म्हणत पवारांनी मोदींवर उपरोधिक टीकाही केली. नाशिकमधील पिंपळगावच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पवारांनी पंतप्रधान मोदींची नक्कल करून खिल्लीही उडविण्याचा प्रयत्न केला. पुणे येथील मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणादरम्यान मोदींनी पवारांवर स्तुतीसुमने उधळली होती. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी ही टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजपाचा मित्रपक्ष आणि सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेनेकडून नोटाबंदीबाबत सातत्याने होणारी टीका, नोटाबंदीचा शेतक-यांवर होणार परिणाम यावरही भाष्य केले.

56 इंचाची छाती असलेल्या माणसाने घेतलेल्या निर्णयामुळे पहिले लोक खूश होते, मात्र त्यानंतर त्यांना रांगेत उभे राहावे लागले. संसदेतल्या बँकेतही पैसे नसल्यानं 24 हजारांचा चेकही देण्यात आला. मात्र फक्त 10 हजार रुपयेच हाती आले, असेही शरद पवार म्हणाले आहेत. भाजपाचे खासदार मोदींना खूप घाबरत असून, खासगीत मला मोदींना समजवायला सांगत असल्याचाही गौप्यस्फोट यावेळी पवारांनी केला आहे.

नोटाबंदीमुळे माझी 2 एकरांवरील वांगी मातीमोल झाल्यानं त्यावर मला पुन्हा ट्रॅक्टर घालावा लागला. कांदा, टोमॅटोसह इतरही शेतमालाचे भाव घसरले, असंही त्यांनी टीका केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरही सहकारी बँकेत जमा झालेले 8 हजार 600 कोटी कोणी स्वीकारत नसल्याचंही पवार म्हणाले आहेत.

नोटाबंदीवरून मोदींवर सोडले टीकास्त्र

 जेव्हा मूठभर लोक देशाचा निर्णय घेऊ लागतात तेव्हा त्यात देशहित सामावलेले नसते. अशावेळी होणारे निर्णय अराजक असतात. देश सध्या अशाच प्रकारे अराजकतेकडे वाटचाल करीत असल्याची टीका पवार यांनी केली. नोटाबंदीमूळे शेतकरी आणि कष्टकरी उध्वस्त झाले आहेत, जनता सर्व लक्षात ठेवते आणि योग्य वेळी निर्णय घेते. आणीबाणी नंतर जनतेने इंदिरा गांधी यांना पराभूत केले होते याचे स्मरण पवार यांनी करून दिले. 

https://www.dailymotion.com/video/x844nce

Web Title: I heard the praise of Modi - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.