‘मला जगण्यासाठी दहा लाख पाहिजे...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:33 AM2020-09-09T01:33:05+5:302020-09-09T01:34:25+5:30

वेळ : दुपारी दीड वाजेची... ठिकाण : आयडीबीआय बॅँक, एम.जी.रोड... जिन्स, पिवळा शर्ट घातलेला एक व्यक्ती थेट बॅँकेत घुसतो व महिला व्यवस्थापकाच्या मानेभोवती चाकू लावत दुसऱ्या हाताने गळा आवळून धरतो अन् म्हणतो ‘मला जगण्यासाठी १० लाख रुपये पाहिजे, पैसे काढून द्या..’ यामुळे बॅँकेत एकच गोंधळ उडतो

‘I need a million to survive ...’ | ‘मला जगण्यासाठी दहा लाख पाहिजे...’

‘मला जगण्यासाठी दहा लाख पाहिजे...’

Next
ठळक मुद्देबॅँकेत येऊन महिला व्यवस्थापकाला चाकूने धमकावले

नाशिक : वेळ : दुपारी दीड वाजेची... ठिकाण : आयडीबीआय बॅँक, एम.जी.रोड...
जिन्स, पिवळा शर्ट घातलेला एक व्यक्ती थेट बॅँकेत घुसतो व महिला व्यवस्थापकाच्या मानेभोवती चाकू लावत दुसऱ्या हाताने गळा आवळून धरतो अन् म्हणतो ‘मला जगण्यासाठी १० लाख रुपये पाहिजे, पैसे काढून द्या..’ यामुळे बॅँकेत एकच गोंधळ उडतो अन्य पुरुष कर्मचारी त्या महिलेच्या मदतीसाठी धाव घेतात; मात्र याचवेळी तो चाकूधारी व्यक्ती अधिक आक्रमक होतो. काही वेळेतच बॅँकेत पोलीस येऊन धडकतात अन् त्या चाकूधारीला बेड्या ठोकतात.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एम.जी. रोडवरील आयडीबीआय बॅँकेत सोमवारी (दि.७) नियमितपणे व्यवहार सुरू असताना पिवळा शर्ट व जिन्स घातलेला व तोंडावर मास्क लावलेला एक व्यक्ती ग्राहक म्हणून येतो. बॅँकेतील सर्व्हिस आॅपरेशन व्यवस्थापक तृप्ती अग्रवाल (४०, रा. सिरीन मेडोज, गंगापूररोड) यांच्या खुर्चीजवळ येऊन थर्ड पार्टी पेमेंटबाबत विचारणा करतो. अग्रवाल यांनी त्यास खुर्चीपासून लांब उभे राहण्यास सांगितले. यानंतर ही व्यक्ती बॅँकेतून निघून गेली; मात्र पुन्हा काही मिनिटांत माघारी फिरली आणि थेट अग्रवाल यांच्या खुर्चीजवळ जात त्यांची मान एका हाताने आवळत दुसºया हाताने चाकू काढत गळ्याभोवती लावला. हा सगळा प्रकार बघून त्यांनी मदतीसाठी आरडाओरड करताच बॅँकेतील अन्य सहकारी त्यांच्या मदतीसाठी धावले असता चाकूधारी अधिक आक्रमक होत म्हणाला, ‘मला जगण्यासाठी १० लाख रुपये पाहिजे, पैसे काढून द्या...’ काही वेळेतच बॅँकेत पोलीस आले आणि त्यास ताब्यात घेतले.
...अन् त्याने चाकू हटविला
बॅँकेचे विभागीय अधिकारी यांनी स्वत: त्याची मागणी पूर्ण करणार असल्याचे सांगितल्यावर चाकूधारी व्यक्तीने मानेवर लावलेला चाकू बाजूला करत अग्रवाल यांना सोडले. त्याने ‘मला जगायचे आहे, पैसे द्या’ असा तगादा लावत स्वत:चे नाव अमर अशोक बोराडे (रा. तारवालानगर) असे सांगितले. चाकूधारी व्यक्तीने अग्रवाल यांच्या हातावर वार करत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: ‘I need a million to survive ...’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.