भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा केला पण आता लागली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:19 AM2021-09-09T04:19:24+5:302021-09-09T04:19:24+5:30
चौकट- पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रार्दुभाव जिल्ह्यातील काही भागात सोयाबिनवर पाने, शेंगा कुरतडणाऱ्या अळीची प्रार्दुभाव झाला असल्याचे दिसुन आले आहे. ...
चौकट-
पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रार्दुभाव
जिल्ह्यातील काही भागात सोयाबिनवर पाने, शेंगा कुरतडणाऱ्या अळीची प्रार्दुभाव झाला असल्याचे दिसुन आले आहे. याची संख्या मर्यादीत आहे. सोयाबिन सध्या फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. अळीने जर कोवळ्या शेंका कुरतडण्यास सुरुवात केली तर त्याचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात नसली तरी या अळीचा वेळीच बंदोबस्त करायला हवा.
चौकट-
ही घ्या काळजी-
सोयाबिनच्या ज्या क्षेत्रावर अळीचा प्रार्दुभाव दिसुन येत आहे त्या शेतकऱ्यांनी आताच निंबोळी अर्क आणि जैवीक किटक नाशकांची फवारणी केली तर पुढे जाउन रासायणिक कीटकनाशकांची फवारणी करण्याची वेळ येणार नाही. यामुळे खर्चात बचत होईल. अळीचे प्रमाण कमी असल्यामुळे निंबोळी अर्काने ती अटोक्यात येण्यासारखी स्थिती आहे.
चौकट-
शेतकऱ्यांना खर्च निघण्याची चिंता
सायाबिनची एकरी उत्पादकता मकापेक्षा खुपच कमी असते. मर्यादित उत्पादनाला जर चांगला दर मिळाला तरच शेतकऱ्यांच्या खर्चाची तोंडमिळवणी होत असते यावर्षी उत्पादन वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्यामुळे येत्या हंगामात सोयाबीनला सध्या आहे तेवढाच भाव मिळेल की नाही याबाबत शासंकता व्यक्त केली जात असल्याने सायाबिनला केलेला खर्च तरी निघेल की नाही याची आतापासूनच शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
कोट-
मागीलवर्षी परदेशातही सोयाबिनची टंचाई निर्माण झाली होती त्यामुळे शेवटी शेवटी आपल्याकडे दर वाढले होते. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मका ऐवजी सोयाबिनचा पेरा केला आहे. पिकस्थितीही चांगली असल्यामुळे यावर्षी उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आता जो भाव आहे ताच पुढे मिळेल असे नाही. - नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.