मला हवाय जन्म नवा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:20 AM2020-02-29T00:20:58+5:302020-02-29T00:22:14+5:30
कवयित्री डॉ. माधवी गोरे यांनी सादर केलेली ‘असं कोणीच विचारत नसतं, काय हवंय तुला? पण कोणी विचारले तर म्हणेन ‘मला हवाय जन्म नवा’ या स्त्री जीवन आणि वृक्षाच्या जीवनातील साम्य दर्शविणाऱ्या कवितेसह कवी संजय गोरडे यांची कोºया कोºया कपाळावर आणि ज्येष्ठ कवी राम पाठक यांच्या मुक्त छंदातील ‘काळोख कुळातील पोरी’ आदी कवितांनी नाशिकर रसिकांना भारावून टाकले.
नाशिक : कवयित्री डॉ. माधवी गोरे यांनी सादर केलेली ‘असं कोणीच विचारत नसतं, काय हवंय तुला? पण कोणी विचारले तर म्हणेन ‘मला हवाय जन्म नवा’ या स्त्री जीवन आणि वृक्षाच्या जीवनातील साम्य दर्शविणाऱ्या कवितेसह कवी संजय गोरडे यांची कोºया कोºया कपाळावर आणि ज्येष्ठ कवी राम पाठक यांच्या मुक्त छंदातील ‘काळोख कुळातील पोरी’ आदी कवितांनी नाशिकर रसिकांना भारावून टाकले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात ‘कुसुमाग्रज स्मरण’ अंतर्गत शुक्रवारी (दि. २८) कवी संमेलनात कवी संजय चौधरी, संजय गोरडे, डॉ. माधवी गोरे, प्रथमेश पाठक, नंदन रहाणे व राम पाठक यांनी त्यांच्या काव्य रचनांनी उपस्थितांची मने जिंकली. या काव्यमैफलीत कवी नंदन राहणे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणाºया ‘दिला कोणी ना टोल एकही’ व लुबाडणारे लबाड करती निर्दय थट्टा या गझल शैलीतील काव्याचे सादरीकरण केले, तर राम पाठक यांनी ‘तू नकोस गुंफू वेणी’ गझल सादर करीत दाद मिळविली. त्यांच्या काळोख कुळातील पोरी या रचनेने संपूर्ण सभागृह गंभीर झाल्याचे दिसून आले. प्रथमेश पाठक यांनी धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला सामना करावा लागणाºया वाहतूक कोंडीवर आधारित ‘रस्त्यामधून चालत असता कविता धक्का देऊन जाते’ रचना सादर करतानाच विशेष मुरला नव्हतो तो कामात खाटकाच्या या गंभीर कवितेला रसिकांनी दाद दिली. क वी संजय चौधरी यांनी त्यांच्या खास शैलीत निवेदन करताना वेगवेगळे शेर, चारोळ्यांसोबतच कुसुमाग्रजांच्या काही रचनाही रसिकांना ऐकाविच त्यांची स्वत:ची ‘वयाची कविता’ व बाईने जेवढं झाकलं स्वत:ला या रचना सादर केल्या. अखेरच्या आवर्तनात क वयित्री डॉ. कवयित्री डॉ. माधवी गोरे यांनी देखो जब तूम आओगे या हिंदी रचनेसह ‘रोजचा नियम’ कवितेने सभागृहातील रसिकांना भावुक केल्याचे दिसून आले.