माझी नियुक्ती झाली, पण शिक्के मिळाले नाही..! मी लाभार्थी : भाजपा कार्यकर्त्यांची तक्रार; बोलणार कोणाविरूद्ध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:47 AM2017-11-17T00:47:00+5:302017-11-17T00:49:33+5:30

सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी सर्वांत छोटे सत्तापद म्हणजे विशेष कार्य अधिकारी. परंतु दोन वर्षांपासून या पदासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना जिल्हा प्रशासनाकडून शिक्का आणि ओळखपत्रच दिले जात नसल्याची तक्रार आहे.

I was appointed, but I did not get the stamp! I am a beneficiary: Complain of BJP workers; Who will talk about? | माझी नियुक्ती झाली, पण शिक्के मिळाले नाही..! मी लाभार्थी : भाजपा कार्यकर्त्यांची तक्रार; बोलणार कोणाविरूद्ध?

माझी नियुक्ती झाली, पण शिक्के मिळाले नाही..! मी लाभार्थी : भाजपा कार्यकर्त्यांची तक्रार; बोलणार कोणाविरूद्ध?

Next
ठळक मुद्देगतिमान सरकार कसे म्हणायचेपद साक्षांकनासाठी महत्त्वाचे कुटुंबात सहा सहा जणांना अधिकार

नाशिक : सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी सर्वांत छोटे सत्तापद म्हणजे विशेष कार्य अधिकारी. परंतु दोन वर्षांपासून या पदासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना जिल्हा प्रशासनाकडून शिक्का आणि ओळखपत्रच दिले जात नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे १८०० पैकी सुमारे एक हजार कार्यकर्ते जिल्हाभरात शिक्क्यापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, अशाप्रकारचे शिक्के उपलब्ध झालेच तर ते भाजपा कार्यकर्त्यांना प्राधान्याने दिले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांचीदेखील अशीच तक्रार असून, पक्षाची सत्ता असूनही शिक्के मिळत नसतील तर हे गतिमान सरकार कसे म्हणायचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
विशेष कार्य अधिकारी पद साक्षांकनासाठी महत्त्वाचे मानले जाते. पदसिद्ध म्हणून प्राचार्य, राजपत्रित अधिकारी आणि नगरसेवकांना याबाबत अधिकार असला तरी त्या दर्जाचे पद मिळत असल्याने सामान्य कार्यकर्ते समाधानी असतात. कोणाला साक्षांकन करण्यासाठी परिसरात अशाप्रकारचा कार्यकर्ता असला तर नागरिकांनादेखील सोयीचे वाटते. परंतु यंदा भाजपा सरकारने यादी नेमताना मुळातच केलेला विलंब, त्यातील नियम निकषांच्या अटी तसेच आता नियुक्ती झालीच तर भाजपा आमदारांच्या कुटुंबात सहा सहा जणांना अधिकार अशा अनेक प्रकारांनी या याद्या वादग्रस्त ठरल्या. परंतु आता याद्या आल्या तर शिक्के नाही अशी अवस्था आहे. सुमारे अठराशे कार्यकर्त्यांची विशेष कार्यकारी अधिकाºयांची यादी नेमल्यानंतर दोन वर्षांत जेमतेम आठशे कार्यकर्त्यांना शिक्के मिळाले आहेत, अशी तक्रार आहे. अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांच्याही विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त्या झाल्या असल्या तरी त्यांना शिक्केच मिळत नाही, अशीदेखील तक्रार आहे. नियुक्ती होऊनही दोन दोन वर्षे झाले तरी कार्यकर्त्यांना साधे शिक्के मिळत नसतील तर काय उपयोग? असा प्रश्न कार्यकर्ते करीत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी मात्र शिक्के वाटपात वशिलेबाजी होत असल्याचा दावा फेटाळला असून, उपलब्धतेनुसार शिक्के दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले, तर दुसरीकडे मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनादेखील शिक्के मिळाली नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे असून, आपल्याच सरकारचे आपणच लाभार्थी असल्याने बोलणार कोणाविरुद्ध, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: I was appointed, but I did not get the stamp! I am a beneficiary: Complain of BJP workers; Who will talk about?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.