...चक्क ‘सीपी’ भेटणार थेट पोलीस चौकीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 11:58 PM2020-11-10T23:58:25+5:302020-11-10T23:58:51+5:30

पोलीस ठाण्यातील साप्ताहिक जनता दरबाराच्या धर्तीवर आता दररोज संध्याकाळी पोलीस आयुक्त पाण्डेय हे स्वत: प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीस चौकीला भेट देत तेथील कर्मचाऱ्यांशी व परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे. दररोज संध्याकाळचा एक तास ते एका पोलीस चौकीला देणार आहे.

... I will meet a CP directly at the police station! | ...चक्क ‘सीपी’ भेटणार थेट पोलीस चौकीत !

...चक्क ‘सीपी’ भेटणार थेट पोलीस चौकीत !

googlenewsNext
ठळक मुद्देदररोज एक तास एका चौकीवर : पोलीस वसाहतींनाही देणार भेट

नाशिक : पोलीस ठाण्यातील साप्ताहिक जनता दरबाराच्या धर्तीवर आता दररोज संध्याकाळी पोलीस आयुक्त पाण्डेय हे स्वत: प्रत्येक पोलीस ठाण्यातील पोलीस चौकीला भेट देत तेथील कर्मचाऱ्यांशी व परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधणार आहे. दररोज संध्याकाळचा एक तास ते एका पोलीस चौकीला देणार आहे.

शहर पोलीस आयुक्तालयात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौक्या मिळून सुमारे ७० पोलीस चौक्या आहेत. यामधील काही संवेदनशील भागात आहेत. बहुतांश चौक्या आधुनिक व स्मार्टपद्धतीने विकसित करण्यात आल्या आहेत; मात्र तेथील कामकाज खरेच स्मार्ट झाले आहे का? याबाबतची चाचपणी पाण्डेय करणार आहेत.

पोलीस चौकीत कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठराविक भागातील गुन्हेगार, गुन्हेगारी घटना व तक्रारी यासाठी लक्ष ठेवावे लागते. यामुळे तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत पाण्डेय हे परिसरातील गुन्हेगारी फोडून काढण्यासाठी कानमंत्र देणार आहेत. यावेळी प्रत्येक पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणीही ते जाणून घेणार आहेत. पोलीस चौक्यांप्रमाणेच त्यांचा कारभारसुद्धा स्मार्ट होणे गरजेचे आहे, त्यामुळे येथील कामकाजात सुधारणा व्हाव्यात, या उद्देशाने पाण्डेय यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. पाण्डेय यांच्या पोलीस ठाण्यातील दरबाराबाबत दोन दिवसांपूर्वीच उपायुक्तांना माहिती दिली जाते; मात्र पोलीस चौकी भेटीची माहिती संबंधित परिमंडळाच्या उपायुक्तांना केवळ तासाभरापूर्वी दिली जाणार आहे हे विशेष !

पोलीस वसाहतींमधील समस्याही सुटणार

ज्या वसाहतींमध्ये पोलीस शिपायापासून उपनिरीक्षकांपर्यंत अधिकारी व कर्मचारी वास्तव्यास आहेत, त्या वसाहतीत त्यांच्या कुटुंबीयांना सोयी-सुविधा मिळणे हा त्यांचा नैतिक अधिकार आहे, यामुळे पोलीस वसाहतींना अचानकपणे थेट भेट देत तेथे राहणाऱ्या पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाण्डेय म्हणाले.

Web Title: ... I will meet a CP directly at the police station!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.