महिलांच्या आरोग्यासाठी कार्यरत आयएमए महिला विंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:52 AM2017-09-25T00:52:11+5:302017-09-25T00:52:16+5:30

IAA Women Wing working for women's health | महिलांच्या आरोग्यासाठी कार्यरत आयएमए महिला विंग

महिलांच्या आरोग्यासाठी कार्यरत आयएमए महिला विंग

Next

परिचय महिला संस्थांचा
डियन मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या शाखा देशभर आहेत. त्यात महिला डॉक्टरही असतात. पण शहरातील महिला डॉक्टरांची वाढती संख्या, निरनिराळे उपक्रम राबविण्याचा त्यांचा हुरूप पाहता आयएमए महिला विंगची दोन वर्षांपूर्वी २०१५ मध्ये स्थापना करण्यात आली. आयएमए सदस्य महिला डॉक्टर या विंगच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन व्यग्र रुटिनमधून, कौटुंबिक जबाबदाºयांमधून वेळ काढून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देतात. यातून समाजासाठी काहीतरी करत असल्याचे समाधान आणि गरजूंना उपयोगी पडण्याचे सत्कर्म अशा अनेक गोष्टी साध्य होत असल्याने विंगच्या सदस्या नेहमीच निरनिराळे उपक्रम राबविण्याचे नियोजन करताना दिसतात.
मागील वर्षापासून आयएमए महिला विंगतर्फे तेजस्विनी प्रोजेक्ट राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत किशोरवयीन मुलींसाठी व्याख्यान, वैद्यकीय तपासणी, प्रात्यक्षिके आदी विविध उपक्रम राबविले जातात. शासकीय कन्या शाळा, आर्थिकदृष्ट्या कमजोर वर्गातील मुली, शहराबरोबरच ग्रामीण भागातील आश्रमशाळांमधील मुलींसाठी या प्रकल्पांतर्गत आजवर शरीरओळख, एचबी तपासणी, एचबी वाढविण्याचे उपाय, अ‍ॅनिमियाचे दुष्परिणाम, रक्तगट तपासणी, मासिक पाळीसंबंधी माहिती, चांगले-वाईट स्पर्श, गर्भधारणा, त्वचा व केसांची काळजी आदी विविध विषयांवर प्रात्यक्षिकांसह व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. याशिवाय विंगतर्फे परिचारिका दिनी परिचारिकांचा सत्कार, सुदृढ बालक स्पर्धा, महिला डॉक्टरांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, झुंबा कार्यशाळा, योगासन वर्ग, हास्ययोग, अक्वा झुंबा, गरबा कार्यशाळा, शाडू गणेशमूर्ती कार्यशाळा, मोनोपॉझ कार्यशाळा आदी उपक्रम राबविण्यात आले. डॉक्टर हा नेहमी या ना त्या कारणांनी मग्न असतो. त्याला स्वत:साठी वेळ मिळावा, निसर्गाच्या सान्निध्यात जाता यावे यासाठी शहराच्या जवळपासच्या डोंगरांवर ट्रेकिंग कॅम्पही आयोजित केले जातात. विंगमध्ये सध्या डॉ. राजश्री पाटील, डॉ. कविता गाडेकर, डॉ. सुषमा दुगड, डॉ. प्राजक्ता लेले यांच्यासह अनेक महिला डॉक्टर सक्रिय सहभाग देत आहेत.

 

Web Title: IAA Women Wing working for women's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.