इगतपुरीत टोळक्यकडून तरुणास मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल

By admin | Published: February 3, 2015 01:00 AM2015-02-03T01:00:12+5:302015-02-03T01:00:44+5:30

इगतपुरीत टोळक्यकडून तरुणास मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल

Iagatpuri gang attacked the youth; Four of the accused have been booked | इगतपुरीत टोळक्यकडून तरुणास मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल

इगतपुरीत टोळक्यकडून तरुणास मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल

Next

  इगतपुरी : इगतपुरी येथे वादात गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केला आहे. या प्रकरणी चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अलिम हसन शेख (३०, इगतपुरी) हा सेंट्रल हॉटेल इगतपुरी येथून घरी जात असताना सायंकाळी ५.४५ च्या सुमारास बाजारपेठेतील नम्रता हॉटेलच्या मागे व अत्तरच्या दुकानासमोर डेव्हिड पॅट्रिक मॅनवेल, फारुख पॅट्रिक मनवेल, कौऊ पॅट्रिक मॅनवेल व अलिम सलमान शेख या चौघांनी अडविले. यावेळी डेव्हिडने अलिमशी वाद घालत तू मला शिवीगाळ केली. असा दम देऊन चाकू काढून छातीवर व हातावर मारला. यावेळी अलिमने हाताने वार अडविला मात्र त्याचवेळी फारुखने त्याचा गळा आवळून दाबला. त्याचवेळी कौऊ मॅनवेल व अलिम शेख या दोघांनी लाकडी दांडा व बॅटने जोरदार मारहाण केली. उजव्या डोळ्यास ठोसा मारून गंभीर दुखापत केली. अलिम शेख हा गंभीर जखमी असून, त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, आरोपींवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Iagatpuri gang attacked the youth; Four of the accused have been booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.