जीएसटी कमी होऊनही आइस्क्रीमचा थंडावा महागच
By admin | Published: July 15, 2017 12:04 AM2017-07-15T00:04:09+5:302017-07-15T00:13:30+5:30
आइस्क्रीमजीएसटी लागू होण्यापूर्वीच्याच दरांनी सध्या विक्री केली जात असून, कंपन्यांकडून दरांमध्ये बदल झाले तरच त्यात बदल केला जाणार असल्याचे डिस्ट्रिब्युटर व विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सरकारने जाहीर केलेल्या जीएसटीअंतर्गत आइस्क्रीम व संबंधित पदार्थांवरील कराचा बोजा कमी करण्यात आला असला आणि त्यामुळे आइस्क्रीमच्या किमती कमी होण्याची अपेक्षा असताना मूळ कंपन्यांनी आइस्क्रीमचे भाव जैसे थे च ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आइस्क्रीमजीएसटी लागू होण्यापूर्वीच्याच दरांनी सध्या विक्री केली जात असून, कंपन्यांकडून दरांमध्ये बदल झाले तरच त्यात बदल केला जाणार असल्याचे डिस्ट्रिब्युटर व विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. पूर्वी आइस्क्रीम व चॉकलेट आदी पदार्थांवर २८ टक्के कर होता. तो आता १८ टक्क्यांवर आला आहे. म्हणजे ८ टक्के कर कमी झाला आहे. स्वाभाविक आइस्क्रीमचे दर कमी व्हायला हवेत. परंतु अद्याप मूळ कंपन्यांनी कोणतेही बदल लागू केलेले नसून जीएसटीनंतर आइस्क्रीम उद्योगात दर बदल करणे, बिलिंग पद्धतीत बदल करणे या गोष्टी व्हायला आठवडा ते पंधरवडा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढलेल्या जीएसटीचा फायदा कंपन्या स्वत:पुरताच सीमित ठेवून ग्राहकांना पूर्वीच्याच दरांनी सेवा देत फसवणूक करण्याची शक्यताही बोलून दाखविली जात आहे. कंपन्यांना होणाऱ्या फायद्यात ग्राहकांनाही सहभागी करून घ्यायला हवे तरच आइस्क्रीमचा गोडवा आणखी वाढला, असे म्हणता येईल.