ICSE Results 2022: निशादने स्वयंअध्यनाच्या जोरावर उमटवला आयसीएसई बोर्डात ठसा!
By नामदेव भोर | Published: July 17, 2022 10:21 PM2022-07-17T22:21:25+5:302022-07-17T22:50:20+5:30
ICSE Results 2022: राष्ट्रीय क्रमवारीत ३९व्या स्थानवर त्याने यश संपादन केले असून नाशिक जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे.
नाशिक : कॉन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशनच्या (आयसीएसई) दहावी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. या दहावीच्या परीक्षेत नाशिकच्या निशाद समीर टक या विद्यार्थ्याने देशात तीसरा क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. निशाद नाशिकमधील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गंगापूररोड येथील होरायझन स्कूलचा विद्यार्थी असून त्याने शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वयंअध्यक्षनाच्या जोरावर हे यशाचे शिखर गाठल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नाशिकमधील फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलमधू शालेय शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या निशादने सहावीपर्यंतचे शिक्षण फ्रावशीस स्कूलमध्ये घेतल्यानंतर सातवीत होरायझन ॲकेडमीत प्रवेश घेतला होता. या शाळेतही त्याने शिक्षकांच्या अद्यापनासह काही टेक्स्ट सिरीजच्या माध्यमातून स्वयंअध्ययन करून दहावीच्या परीक्षेत राष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता यादीत तीसरा क्रमांक पटकावला.
राष्ट्रीय क्रमवारीत ३९व्या स्थानवर त्याने यश संपादन केले असून नाशिक जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. ही आनंदाची बातमी मिळताच निशादच्या कुटुंबियांचा आनंद गगणात मावेनासा झाला असून निशादच्या यशामागे त्याचे कठीण परीश्रम आणि शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन असल्याची प्रतिक्रिया निशादची आई रैना व वडील समीर टक यांनी व्यक्त केली आहे.