आयडीबीआय बॅँक पीककर्ज देणार
By admin | Published: June 18, 2017 12:32 AM2017-06-18T00:32:01+5:302017-06-18T00:32:21+5:30
आयडीबीआय बॅँक पीककर्ज देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भारत सरकारची ७४ टक्के भागीदारी असलेली आयडीबीआय बॅँक आता माफक दरात गृहकर्ज तसेच शासनाच्या निर्देशानुसार दीर्घ मुदतीचे पीककर्ज देणार असल्याची माहिती आयडीबीआय बॅँकेचे महाव्यवस्थापक अभय बोंगिरवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आतापर्यंत केवळ इन्फ्रास्ट्रक्चर व इंडस्ट्री क्षेत्रासाठी जादाचा कर्ज पुरवठा करणारी आयडीबीआय बॅँक आता सार्वजनिक क्षेत्रातील रिटेल क्षेत्रात जास्तीचा कर्ज पुरवठा करणार आहे. मुंबई झोन अंतर्गत १५१ शाखा व ४०३ एटीएम केंद्रे उपलब्ध असून, मुंबई झोनमध्ये मुंबई, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्णांचा समावेश होता. कॉर्पोेरेट क्षेत्रावर आलेला ताण पाहता बॅँकेने रिटेल व प्राथमिकता प्राप्त क्षेत्र जसे कृषी व कृषिपूरक व्यवसाय यासाठी सरासरी ७ ते ९ टक्के एकूण कर्ज वाटपाचा असलेला तर आता २० टक्केपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापूर्वी बॅँकेने कॉर्र्पाेरेट सेक्टर्ससाठी ६६ तर रिटेल क्षेत्रासाठी ३३ टक्के असलेला रेश्यू बदलून तो आता रिटेल क्षेत्रासाठी ४९ ते ५० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्वस्त व माफक दरात घरे उभारणाऱ्या मोठ-मोठ्या प्रकल्पांना ८.३० टक्के दराने कर्जपुरवठा करून त्या क्षेत्राकडे जास्तीचे लक्ष देणार असल्याचे मुख्य व्यवस्थापक प्रदीपकुमार दास यांनी सांगितले.