‘कालिदास’च्या नूतनीकरणात कलावंतांच्या सूचनांचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:51 AM2017-08-13T00:51:46+5:302017-08-13T00:51:58+5:30
नाशिक : शहरातील सांस्कृतिक मानबिंदू मानल्या जाणाºया महाकवी कालिदास कलामंदिराचे तब्बल पस्तीस वर्षांनंतर नूतनीकरण सुरू झाले असून, यंदा प्रथमच अशाप्रकारचे काम करताना महापालिका नाट्य कलावंतांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांवरदेखील विचार करणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेचे अधिकारी, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्यांनी कलामंदिराची पाहणी केली. त्यानंतर बुधवारी (दि. १६) नूतनीकरणाचे सादरीकरण करून सूचनांविषयी चर्चा करण्यात येणार आहे.
नाशिक : शहरातील सांस्कृतिक मानबिंदू मानल्या जाणाºया महाकवी कालिदास कलामंदिराचे तब्बल पस्तीस वर्षांनंतर नूतनीकरण सुरू झाले असून, यंदा प्रथमच अशाप्रकारचे काम करताना महापालिका नाट्य कलावंतांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांवरदेखील विचार करणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेचे अधिकारी, तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्यांनी कलामंदिराची पाहणी केली. त्यानंतर बुधवारी (दि. १६) नूतनीकरणाचे सादरीकरण करून सूचनांविषयी चर्चा करण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिका या कलामंदिराचे नूतनीकरण करणार आहे. त्यासाठी शुक्रवारी परिषदेच्या पदाधिकाºयांसमवेत पाहणी करण्यात आली. यावेळी प्रकाश व ध्वनी योजना आदि सूूचना नाट्य परिषदेच्या सदस्यांनी मांडल्या. यावेळी नाट्य परिषदेचे रवींद्र कदम, सुनील ढगे, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, श्याम लोंढे यांसह महापालिकेचे अधीक्षक अभियंता गौतम पगारे, विनोद माडिवाले, धीरज पाटील, संदीप कांकरिया उपस्थित होते.