अभियंता शाखेतर्फे ‘आयडिया चॅलेंज
By admin | Published: September 9, 2016 01:23 AM2016-09-09T01:23:08+5:302016-09-09T01:24:08+5:30
नवोदितांना संधी : उद्योग कल्पकतेला मिळणार व्यासपीठ
’ सातपूर : बुद्धिमान व्यक्तीच्या कल्पनांचा वापर करून नवीन उद्योजक घडविण्यासाठी नाशिकच्या अभियांत्रिकी शाखेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ‘इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्स आयडिया चॅलेंज’ स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मनीष कोठारी यांनी
दिली.
नाशिकमध्ये नवीन उद्योजक घडविण्यासाठी सर्व वयोगटासाठी ही स्पर्धा खुली आहे. ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे. अथवा ज्यांच्याकडे नवीन कल्पना आहे असे सर्व या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार आहे. त्यांच्या कल्पना योग्य गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवून त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कोठारी यांनी सांगितले. ही स्पर्धा पूर्णपणे पारदर्शक आणि गुप्त पद्धतीने राबविण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ‘इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष मनीष कोठारी, सचिव सुमित खिवसरा यांनी केले आहे. दरम्यान, शाखेतर्फे अभियंता दिनानिमित्त दि. १६ आॅक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, याच दिवशी विजेत्या स्पर्धकांच्या नावांची घोषणाही करण्यात येतील यावेळी विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात येणार
आहे. (वार्ताहर)