आदर्श अभियंता पुरस्काराचे सोमवारी होणार वितरण
By Admin | Published: September 15, 2016 12:32 AM2016-09-15T00:32:12+5:302016-09-15T00:36:27+5:30
आदर्श अभियंता पुरस्काराचे सोमवारी होणार वितरण
नाशिक : जिल्हा परिषद व जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श जिल्हा परिषद अभियंता पुरस्कारांचे सोमवारी (दि. १९) वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील व जिल्हा प्रवक्ता प्रशांत जगताप यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात सोमवारी (दि. १९) दुपारी ३ वाजता या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, उपाध्यक्ष प्रकाश वडजे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सभापती किरण थोरे, केदा अहेर, उषा बच्छाव, शोभाताई डोखळे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, रवींद्र परदेशी, मिलन कांबळे, चंद्रशेखर वाघमारे, बापूसाहेब देसले, प्रकाश नंदनवरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी निवड करण्यात आलेल्या पाच अभियंत्यांना आदर्श अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे रावसाहेब पाटील व प्रशांत जगताप यांनी सांगितले. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अभियंता संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र चव्हाण, विजयकुमार इंगळे, रवींद्र बाविस्कर, जयवंत देशमुख, शांताराम जाधव, संजय शहाणे, जितेंद्र पाटील, नितीन पाटील आदिंनी केले आहे. (प्रतिनिधी)