नाशिक शहरात आदर्श फुटपाथसाठी गरज रोड डिझायनिंगची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:01 AM2017-11-12T01:01:47+5:302017-11-12T01:04:37+5:30

शहरात वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिक नेहमीच चर्चा करतात. शिवाय त्यासाठी ट्रॅफिक सेल हवा अशीही चर्चा होते; परंतु प्रत्यक्षात पादचाºयांच्या समस्या सुटत नाहीत. त्यामुळे अर्बन रोड डिझायनर ही संकल्पना आली आहे. महापालिकेने या क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर काम करण्याची तयारी केली असून, अर्बन डिझायनरच्या माध्यमातून आदर्श फुटपाथ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची तयारी आहे.

Ideal footpath road designing in Nashik city | नाशिक शहरात आदर्श फुटपाथसाठी गरज रोड डिझायनिंगची

नाशिक शहरात आदर्श फुटपाथसाठी गरज रोड डिझायनिंगची

Next
ठळक मुद्दे पादचाºयांच्या समस्या सुटत नाहीतआदर्श फुटपाथ संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची तयारी अपघाताचेही प्रमाण कमी होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिक नेहमीच चर्चा करतात. शिवाय त्यासाठी ट्रॅफिक सेल हवा अशीही चर्चा होते; परंतु प्रत्यक्षात पादचाºयांच्या समस्या सुटत नाहीत. त्यामुळे अर्बन रोड डिझायनर ही संकल्पना आली आहे. महापालिकेने या क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर काम करण्याची तयारी केली असून, अर्बन डिझायनरच्या माध्यमातून आदर्श फुटपाथ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची तयारी आहे. सामान्यत: रस्ते म्हणजे वाहने चालविण्याची जागा आणि रस्त्याच्या कडेला असलेली आखलेली किंवा फुटपाथ तयार केलेली जागा ही पादचाºयांची असे मानले जाते. परंतु पादचारी मार्ग आदर्श नसताताच, त्याचा पादचाºयांना कितपत उपयोग होतो याचाच परामर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्ते खरे तर केवळ वाहतूकच नाही, तर त्या भागाचे वैशिष्ट्य, संस्कृती सांगणारे असतात. याशिवाय त्या-त्या रस्त्यांवर काही महत्त्वाची ठिकाणे, प्रसिद्ध दुकाने असतात. कित्येकदा नागरिक दुचाकी पार्क करण्यासाठी त्याचा वापर करतात. या सर्वांचा विचार नव्या आदर्श फुटपाथमध्ये करण्यात येतो. जेथे रस्ते स्थानिक स्वरूपाचे आहेत, त्याठिकाणी रोड डिझाईन करणे सोपे आहे. अशा ठिकाणी अस्तित्वात असलेल्या रस्त्यांना डिझाईनमध्ये दुरुस्ती करून एक सुरक्षित आणि पुरेसे रुंद करता येते. तसेच अगदी नवीन फुटपाथ नाही तर सलग समपातळीला पदपथ असावा म्हणूनसुद्धा उपाय होऊ शकतो.
नव्या संकल्पनेत फुटपाथला हवी तशी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर या फुटपाथचा योग्य वापर व्हावा यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. दुकाने, त्यासमोरील लोक, झुडपे, विद्युत रोहित्र यांनादेखील जागा देता येते .अर्थातच, फुटपाथसाठी आवश्यक जागेच्या पलीकडे ही जागा असली पाहिजे. किंबहुना रोड डिझायनर्स तसे डिझाइन करून देतात. याशिवाय बस स्टॉप आणि पार्किंगसाठीदेखील जागा देता येते. त्यासाठी तसे खास डिझाइनही केले जाते. त्यातून हे शक्य होते. नागरिकांच्या सोयीचे आणि सर्वांना वापर करता येईल असे फुटपाथ असतील तर मग सर्वच जण त्याचा वापर करू शकतील. 
रस्ते डिझाईन हे तांत्रिक काम असले तरी फुटपाथ ही सर्वांना आवश्यक वाटणारी बाब आहे. नाशिकमध्ये ज्या रस्त्यांवर एक दोन लेन आहेत आणि याच रस्त्यावर पार्किंगही होत असेल तर अशा मार्गावर पदपथ असणे आवश्यक आहे. तसे डिझाईन केले तर पादचाºयांना सुलभ होईल. त्यामुळे अपघाताचेही प्रमाण कमी होईल.

Web Title: Ideal footpath road designing in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.