आदर्श गणेशोत्सवाची सुरुवात नाशिकपासून : सिंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:48 AM2017-08-19T00:48:29+5:302017-08-19T00:49:12+5:30
सकारात्मक दृष्टिकोनाच्या नाशिककरांमुळे शहरात पोलिसांनी राबविलेले नावीन्यपूर्ण तसेच समाजोपयोगी उपक्रमांची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे़ या उपक्रमांप्रमाणेच आगामी गणेशोत्सव, बकरी ईद हे सण राज्यासमोर आदर्शवत ठरतील, असे साजरे करून ‘नाशिक गणेश फेस्टिव्हल’चा एक बॅ्रण्ड तयार करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी सोमवारी (दि़१४) चोपडा लॉन्स येथे केले़
नाशिक : सकारात्मक दृष्टिकोनाच्या नाशिककरांमुळे शहरात पोलिसांनी राबविलेले नावीन्यपूर्ण तसेच समाजोपयोगी उपक्रमांची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे़ या उपक्रमांप्रमाणेच आगामी गणेशोत्सव, बकरी ईद हे सण राज्यासमोर आदर्शवत ठरतील, असे साजरे करून ‘नाशिक गणेश फेस्टिव्हल’चा एक बॅ्रण्ड तयार करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी सोमवारी (दि़१४) चोपडा लॉन्स येथे केले़ गणेशोत्सवातून जनप्रबोधन, पर्यावरणाचे रक्षण, सामाजिक एकोपा तसेच ध्वनी व जलप्रदूषणास आळा घालून आदर्शवत करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले़
गणेशोत्सव, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे गंगापूर रोडवरील चोपडा लॉन्स येथे शांतता समिती तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ प्रास्ताविकात पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी गतवर्षी ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणाºया ३६ मंडळे, दखलपात्र एक व अदखलपात्र सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती़ यंदा मंडळांनी याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले़ तर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी गणेशोत्सवात दक्षतेबाबत माहिती दिली़
आमदार सीमा हिरे यांनी, गणेश विसर्जनाची मिरवणूक वेळेत सुरू करावी, गोदावरीचे प्रदूषण होऊ नये यासाठी मूर्तीचे दान करण्यास पाठिंबा देण्याचे आवाहन केले तर आमदार बाळासाहेब सानप यांनी मिरवणुकीतील प्रत्येक मंडळाला आपल्या कलागुणांचे सादरीकरणासाठी मिरवणूक सकाळी अकरा वाजेच्या सुमारास प्रारंभ करण्याची सूचना केली़ तसेच ज्या मंडळांना एकाच जागेवर नाचायचे असल्यास इतर मंडळांना पुढे जाऊ द्यावे, अशी सूचना केली़
यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, नगरसेवक विलास शिंदे, शहर ए खतिब, प्रफुल्ल संचेती आदींसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.