बिनविरोध निवडीची आदर्श परंपरा तिसऱ्यांदा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 06:29 PM2020-12-30T18:29:02+5:302020-12-30T18:38:39+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश ठिकाणी निवडणुकीसाठी रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आठ ग्रामपंचायतींपैकी टिटोली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे.

The ideal tradition of uncontested selection persists for the third time | बिनविरोध निवडीची आदर्श परंपरा तिसऱ्यांदा कायम

इगतपुरी तालुक्यातील टिटोली ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडीप्रसंगी नवनिर्वाचित सदस्य व रामदास भोर, संजय आरोटे, हिरामण कडू, हरिश चव्हाण, श्रीकांत काळे व ग्रामस्थ.

Next
ठळक मुद्देहॅटट्रीक : इगतपुरी तालुक्यातील टिटोली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

घोटी : इगतपुरी तालुक्यात आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश ठिकाणी निवडणुकीसाठी रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान आठ ग्रामपंचायतींपैकी टिटोली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहे. सात जागांसाठी बुधवारी (दि.३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निश्चित झाले आहे. संपूर्ण टिटोली गावाने संघटित होऊन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडीची ही हॅटट्रिक आहे. तिसऱ्यांदा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ग्रामस्थांनी संघटितपणे पुढाकार घेतला. इगतपुरी तालुक्यात वर्षाच्या सुरुवातीलाच आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने त्या गावांत चुरस आहे. त्यात टिटोली गावाने आदर्श निर्माण करून बिनविरोध ग्रामपंचायत निवडीची हॅटट्रिक केली आहे. गेल्या १५ वर्षांपासून ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आली आहे. ही आदर्श परंपरा यावेळीही कायम ठेवण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण सात जागांसाठी सातच अर्ज दाखल झाले. प्रभाग क्र १ मधून अनुसूचित जमाती गटातून कोमल दशरथ हाडप तर ओबीसी स्त्री राखीव गटातून ज्योती बोंडे, प्रभाग क्र. २ मधून अनुसूचित जमाती गटातून भरत गभाले तर अनु. जमाती महिला राखीव गटातून लक्ष्मी गभाले तर प्रभाग क्र. ३ मधून सर्वसाधारण गटातून अनिल भोपे, अनु. जमाती महिला राखीव गटातून काजल गभाले तर सर्वसाधारण महिला राखीव गटातून माया भडांगे यांचे अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

 

Web Title: The ideal tradition of uncontested selection persists for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.