सिन्नरला नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:56 AM2018-07-29T00:56:06+5:302018-07-29T00:56:28+5:30

नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम सिन्नरला उभे राहिले असून, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम तीन वर्षात जिल्ह्यातल्या एक हजार गावांत पोहचण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.

Ideal work of Sinnarala river revival | सिन्नरला नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम

सिन्नरला नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम

Next

सिन्नर : नदी पुनरुज्जीवनाचे आदर्श काम सिन्नरला उभे राहिले असून, युवामित्र, टाटा ट्रस्ट व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम तीन वर्षात जिल्ह्यातल्या एक हजार गावांत पोहचण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.  देवनदी पुनरुज्जीवन व एकात्मिक उपजीविका विकास कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय सहविचार सभेत ते बोलत होते. आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, टाटा ट्रस्टचे मुकुल गुप्ते, अशोक कुमार, नगराध्यक्ष किरण डगळे, युवानेते उदय सांगळे, पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगन्नाथ भाबड, नालंदा फाउण्डेशनचे संजय जोशी, नेचर कॉन्झर्व्हेनसचे रॅनी थॉमस, युवामित्रचे अध्यक्ष सुनील पोटे आदी उपस्थित होते. सिन्नरमध्ये झालेले काम जिल्ह्यातील इतरही तालुक्यात व्हावे यासाठी युवामित्र-टाटा ट्रस्टने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले. मालेगाव, नाशिक, चांदवड, कळवण, नांदगाव, येवला, दिंडोरी, देवळा, सटाणा या तालुक्यातील ब्रिटिशकालीन २७२ बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन व त्यावरील वितरण व्यवस्था तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल. आमदार वाजे यांनी निधी उपलब्ध केल्याप्रमाणे इतरही तालुक्यातील आमदार, खासदारांचा स्वनिधी, जिल्हा नियोजनमार्फत निधी उपलब्ध करण्यात येईल. टाटा ट्रस्ट, युवामित्रने हे काम एक हजार गावांपर्यंत न्यावे. शास्वत शेतीसाठी मदत करण्यास सदैव तयार असल्याचे ते म्हणाले.  जिल्ह्यातल्या इतर तालुक्यात नदी पुनरुज्जीवनाचे काम व्हावे यासाठी त्या त्या गटातील सदस्याच्या माध्यमातून सेस निधीमार्फत कामे केली जातील. त्याद्वारे ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिले. लहानू भाबड, बापू खैरनार (मालेगाव), सुनील गडाख, अशोक कुमार, डॉ. संजय बेलसरे यांनी मनोगत व्यक्त केले. सहविचार सभेस कोल्हापूर, रायगड, नगर आदी जिल्ह्यासह मालेगाव, बागलाण, दिंडोरी, कळवण, दिंडोरी आदी तालुक्यातील पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. युवामित्रचे अध्यक्ष सुनील पोटे यांनी प्रास्ताविक केले.
शेतीला शुद्ध पाणी देण्यावर भर
सिन्नरला सरस्वती नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात आले असले तरी शहराचे पाणी देवनदीत मिसळून ती प्रदूषित होणार नाही यावर पुढील काळात काम केले जाणार असल्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले. सांडपाणी व्यवस्था व नदी प्रदूषण ही राष्ट्रीय समस्या बनली आहे. तथापि, आपली समस्या आपणच सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. शेतीला शुद्ध पाणी देण्यावर भर असला पाहिजे. त्यातून आजारपणाचे प्रमाण कमी होऊ शकेल, असे मत वाजे यांनी व्यक्त केले.

Web Title: Ideal work of Sinnarala river revival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.