आयडिया प्रदर्शनात संकल्पनांची मांडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:11 AM2018-04-17T01:11:34+5:302018-04-17T01:11:34+5:30

विद्यावर्धन ट्रस्ट संचलित आयडिया कॉलेजच्या वतीने आयोजित ‘एक्सक्लेम २०१८’ वार्षिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी अभ्यासक विद्यार्थी, मान्यवर यांनी भेटी दिल्या.

 Ideas for Idea Display | आयडिया प्रदर्शनात संकल्पनांची मांडणी

आयडिया प्रदर्शनात संकल्पनांची मांडणी

googlenewsNext

नाशिक : विद्यावर्धन ट्रस्ट संचलित आयडिया कॉलेजच्या वतीने आयोजित ‘एक्सक्लेम २०१८’ वार्षिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी अभ्यासक विद्यार्थी, मान्यवर यांनी भेटी दिल्या.प्रदर्शनाच्या दुसºया दिवशी सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, आर्किटेक्ट धनंजय शिंदे, मोसम मजेठिया आदींनी भेटी दिल्या. राजू भुजबळ यांनी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर मनोगत व्यक्त करताना सांगितले की,वास्तुकलेतील तज्ज्ञांच्या कामाचे अभ्यासपूर्वक प्रदर्शन याठिकाणी पहायला मिळत आहे. कायदा, सुव्यवस्थेसारख्या क्षेत्रात काम करताना अशा वेगळ्या विषयावरच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर अनोखे समाधान लाभत असल्याचेही त्यांनी सांगितले, तर आर्किटेक्ट धनंजय शिंदे यांनी वास्तुकलेतील एबीसी साजरी करण्याची ही उत्तम संकल्पना असल्याचे नमूद केले. वर्षभरात केलेल्या कामाची मांडणी करण्याचा उत्तम प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. इंटेरियर डिझायनर मोसम मजिठिया यांनी सांगितले की, मुलांनी केलेले कष्ट या प्रदर्शनातून दिसून येत आहेत. नाशिककरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रदर्शनात महापालिका बाजार, सायन्स सेंटर, बिजनेस सेंटर आणि गरीब लोकांना परवडतील अशी कमी खर्चातील घरे यांच्या प्रतिकृती, आराखडे विद्यार्थ्यांनी सादर केले आहे. याशिवाय मूर्तिकलेच्या विद्यार्थ्यांनीही विविध मूर्ती सादर केल्या आहेत.मूर्तिकलेचे प्रात्यक्षिक सादर करणार विद्यार्थी व शिक्षक मूर्तिकलेचे प्रात्यक्षिक शनिवारी सादर केले. आधुनिक भारतीय आर्किटेक्चरचे शिल्पकार म्हणून आर्किटेक्ट कै. अच्युत कानविंदे, आर्किटेक्ट बाळकृष्णा दोशी आणि आर्किटेक्ट कै. चार्ल्स कोरिया यांना ओळखले जाते. त्यांच्या कामावर आधारित असलेले आणि त्यांच्या नावाच्या आद्याक्षराने सुरु वात करत आर्किटेक्चरची एबीसी अर्थात ‘आधुनिक भारतीय आर्किटेक्चरची पायाभरणी’ या विषयावर आधारित हे प्रदर्शन आहे.

Web Title:  Ideas for Idea Display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.