विद्यार्थिदशेमध्ये विचार बहुआयामी असावे : शेकाटकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:36 AM2018-09-04T00:36:01+5:302018-09-04T00:36:32+5:30
तुम्ही जशी दिशा निवडाल तसे बनाल. विद्यार्थिदशेत आपले विचार हे बहुआयामी असावे. राष्ट्राच्या जडणघडणीत योग्य योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांनी केले. भोसला मिलिटरी स्कूलच्या ८१व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
नाशिक : तुम्ही जशी दिशा निवडाल तसे बनाल. विद्यार्थिदशेत आपले विचार हे बहुआयामी असावे. राष्ट्राच्या जडणघडणीत योग्य योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांनी केले. भोसला मिलिटरी स्कूलच्या ८१व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
शेकटकर पुढे म्हणाले, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाचा नेहमी जयजयकार केला जातो. आपण त्या हेतूने कार्यरत राहा, आजच्या काळात मोबाइल हे सर्वात घातक माध्यम आहे. त्याचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून कामोडोर राजसिंह धनकर, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जाम्बवाल याही उपस्थित होत्या. मुख्य अतिथींच्या हस्ते पारंपरिक ध्वजाचे पूजनही करण्यात आले. त्यानंतर मंचीय कार्यक्र मास सुरु वात झाली. लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जाम्बवाल यांचा सत्कार मुख्य अतिथींच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या प्रगतीचा आढावा संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रामदंडी संस्कार उपाध्ये याने केला. तर मुख्य अतिथींचा सत्कार संस्थेचे सरकार्यवाह डॉ. दिलिप बेलगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह हेमंत देशपांडे, शालेय समिती अध्यक्ष अनिरु द्ध तेलंग, शीतल देशपांडे, श्रीपाद नरवणे, मिलिंद वैद्य, नितीन गार्गे, प्रशांत नाईक, नरेंद्र वाणी , सुहास जपे, रश्मी रानडे, अजित भादक्कर, पराग कणेकर, प्राचार्या चेतना गौड, उपप्रचार्य एम.एन. लोहकरे, कॅप्टन सुरेश चव्हाण, सर्व शाखांचे प्राचार्य, शिक्षक, सैनिकी प्रशिक्षक, पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन यश रेडेकर याने केले. सौरभ शर्मा यांनी आभार मानले.
शहीद स्मारकास मानवंदना
प्रमुख पाहुण्यांनी शहीद स्मारकास मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. संस्थेचे संस्थापक धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांच्या समाधीस मुख्य अतिथिंच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. विद्याथ्यांनी उत्कृष्ट संचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.