ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:29 AM2018-12-25T00:29:11+5:302018-12-25T00:29:32+5:30
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच पथदर्शी उपक्रम नाशिक जिल्ह्यात राबविला जात आहे. त्यातून ज्येष्ठांना मानसिक आधार मिळणार आहे,
नाशिकरोड : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच पथदर्शी उपक्रम नाशिक जिल्ह्यात राबविला जात आहे. त्यातून ज्येष्ठांना मानसिक आधार मिळणार आहे, असे प्रतिपादन सहायक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे यांनी केले. जेलरोडच्या दुर्गामाता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. माजी नगरसेवक शैलेश ढगे संस्थापक अध्यक्ष असलेल्या या संघाच्या २१८ ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप झाले. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद भालेराव, कार्याध्यक्ष राजेंद्र जोशी, सचिव रमेश डहाळे, प्राचार्य के. मा. मोरे उपस्थित होते.
विनायक बोराडे, रवींद्र शहरकर, आत्माराम विसपुते, पुष्पलता विसपुते, नलिनी इंगोले, लता जोशी, मगन थोरात, शांताराम गांगुर्डे यांच्यासह २६ ज्येष्ठांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रभाकर रायते यांनी मनोगत व्यक्त केले. गजानन पाटील, बबनराव बागुल, रामचंद्र बर्वे यांनी संयोजन केले. उषा घोडके, रु पाली सिंग, निर्मला अनसिंगकर, शोभा विभांडिक, मीराबाई राऊत, लता वाणी, रेखा केळकर आदी उपस्थित होते. रमेश डहाळे यांनी सूत्रसंचालन तर राजेंद्र जोशी यांनी आभार मानले.