दुर्मीळ वृक्ष उद्यानाची ओळख हरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:09 AM2020-02-11T00:09:25+5:302020-02-11T01:10:02+5:30

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची ओळख असणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे . त्यातच देखभालअभावी पालापाचोळा आणि गाजरगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

The identity of the rare tree park is lost | दुर्मीळ वृक्ष उद्यानाची ओळख हरवली

दुर्मीळ वृक्ष उद्यानाची ओळख हरवली

Next
ठळक मुद्देमहापालिकेचे दुर्लक्ष : पालापाचोळा-गाजरगवताचे साम्राज्य, स्वच्छतेची मागणी

इंदिरानगर : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु सुमारे एक वर्षापूर्वी त्यांची ओळख असणारे नावाचे चबुतरे हटवण्यात आल्याने त्यांची ओळखच हरवली आहे . त्यातच देखभालअभावी पालापाचोळा आणि गाजरगवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
उद्यानात विविध प्रकारचे औषधी वृक्ष या ठिकाणी लावण्यात आली असून, त्यांची ओळख व्हावी म्हणून परिसरातील निसर्गप्रेमी या ठिकाणी कुटुंबासह भेटी देत असतात वृक्षप्रेमी शा. प्र. दीक्षित व मोहन देवरे यांनी या वृक्षमित्रमंडळाची स्थापना केली. त्या काळी बापूबंगल्यासमोरील मोकळ्या जागेचा केरकचरा टाकण्यासाठी
ुदुरुपयोग होत असल्याने बकालस्वरूप प्राप्त झाले होते. मोकळ्या जागेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी विविध औषध उपयोगी वृक्षांचे आणखी उद्यान साकारण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी सापुतारा ब्रह्मगिरी यांसारख्या विविध जंगले व डोंगरातून दुर्मीळ रोपे आणून लावण्यात आली. दहा वर्षांत उद्यानाचे संवर्धन करून त्याचे वृक्षात रूपांतर झाले. वृक्ष सावली देण्याबरोबरच त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख करून देत आहेत.
उद्यानाच्या प्रत्येक वृक्षालगत चबुतरा बांधून त्यावर त्या वृक्षांची माहिती लिहिण्यात आली होती. त्यामुळे आबालवृद्धांना त्याची ओळख होत असे, परंतु त्यांची ओळख होणारे चबुतरे हटवण्यात आले. त्यांची ओळख नाहीशी झाली आहे. त्यातच सदर उद्यानाची देखभालअभावी गाजरगवत व पालापाचोळामुळे परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे आबालवृद्धांनी आणि वृक्षप्रेमींनी उघानाकडे पाठ फिरवली आहे. तातडीने उद्यानाची कायमस्वरूपी स्वच्छता करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

Web Title: The identity of the rare tree park is lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.